१५ केंद्रांवर १८ वर्षांपुढील वयोगटास डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST2021-08-26T04:34:44+5:302021-08-26T04:34:44+5:30
उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यास मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने रोटेशन पद्धतीने ...

१५ केंद्रांवर १८ वर्षांपुढील वयोगटास डोस
उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यास मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने रोटेशन पद्धतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. गुरुवारी जिल्ह्यातील पाच केंद्रांवर कोविशिल्ड व दहा केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा डोस उपलब्ध असणार आहे. या केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांना पहिला, दुसरा डोस उपलब्ध असेल.
कोरोना रुग्णांची संख्या मागील तीन महिन्यांपासून आटोक्यात आहे. मात्र, कोरोनाचा विषाणूचा संसर्ग पूर्णत: टळला नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण तसेच शहरी भागात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. नागरिकही आरोग्याच्या दृष्टीने लस घेण्याकरिता येत आहेत. असे असले तरी जिल्ह्यास मागणीच्या तुलनेत कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळत नाही. त्यामुळे रोटेशन पद्धतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. गुरुवारी वाशी, भूम ग्रामीण रुग्णालय, परंडा, कळंब उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील ईसीएचएस रुग्णालयात कोविशिल्डचा डोस उपलब्ध राहणार आहे. मुरुम, लोहार, सास्तूर, तेर ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, वैराग रोड व रामनगर भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सिनचा डोस असेल. या दोन्ही केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती यांना प्राधान्याने लस घेता येईल.