चाैंडेश्वरी नाट्यगृहात काेविड चाचणी सेंटर नकाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:31 IST2021-05-01T04:31:26+5:302021-05-01T04:31:26+5:30

भूम : शहरातील संभाजीनगर भागातील नगर परिषदेच्या चाैंडेश्वरी नाट्यगृहात काेविड चाचणी सेंटर स्थापण्याच्या अनुषंगाने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

Don't have a cavid test center at Chandeshwari Natyagriha | चाैंडेश्वरी नाट्यगृहात काेविड चाचणी सेंटर नकाे

चाैंडेश्वरी नाट्यगृहात काेविड चाचणी सेंटर नकाे

भूम : शहरातील संभाजीनगर भागातील नगर परिषदेच्या चाैंडेश्वरी नाट्यगृहात काेविड चाचणी सेंटर स्थापण्याच्या अनुषंगाने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही वार्ता समजताच स्थानिक रहिवाशांनी विराेध सुरू केला आहे. हे सेंटर शहराच्या बाहेर निर्माण करावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय दंडाधिकारी यांना देण्यात आले.

चाैंडेश्वरी नाट्यगृह शहराच्या मध्यभागी आहे. या ठिकाणी दाट लाेकवस्ती आहे. अगाेदरच काेराेनाच्या संकटामुळे लाेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असतानाच नाट्यगृहात काेराेना चाचणी सेंटर सुरू करण्याच्या प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. ही माहिती स्थानिक रहिवाशांना समजल्यानंतर नियाेजित सेंटरला विराेध करण्यात येऊ लागला आहे. अशा प्रकारे दाट लाेकवस्तीत चाचणी केंद्र सुरू न करता शहराबाहेर न्यावे. ज्या ठिकाणी फारशी लाेकवस्ती नसेल. ज्यामुळे काेराेना संसर्गाचा धाेकाही बळावणार नाही. याच अनुषंगाने स्थानिक रहिवाशांनी उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर गणेश वीर, हनुमंत जाधव, आदित्य आकरे, सारिका बामणे, प्रकाश आकरे, सुधाकर काटे, दत्तात्रय निकम, चंद्रकांत आकरे, मेहबूब पठाण, सुरेखा पाटुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Don't have a cavid test center at Chandeshwari Natyagriha