डोंग्रीबा परिवर्तन विकास पॅनल विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST2021-01-22T04:29:53+5:302021-01-22T04:29:53+5:30
पाथरूड : भूम तालुक्यातील सावरगाव (पा) येथील ग्रामपंचायतीत नव्यानेच तरुणांनी उभ्या केलेल्या पॅनलला यश आले. सात जागांपैकी पाच ...

डोंग्रीबा परिवर्तन विकास पॅनल विजयी
पाथरूड : भूम तालुक्यातील सावरगाव (पा) येथील ग्रामपंचायतीत नव्यानेच तरुणांनी उभ्या केलेल्या पॅनलला यश आले. सात जागांपैकी पाच जागांवर डोंग्रीबा परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून आले. भूम तालुक्यातील सावरगाव (पा) येथील ग्रामपंचायत गेली अनेक वर्षांपासून भूम-परंडा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आण्णासाहेब महानवर यांच्या ताब्यात होती. त्यांना येथे वसंत यादव गटाचे आव्हान होते. परंतु, या निवडणुकीत अर्जुन महानवर, शिवहारी महानवर जयराम यादव यांनी एकत्रित येत डोंग्रीबा परिवर्तन पॅनल निवडणूक रिंगणात उतरविला व मतदारांनीही त्यांच्या बाजूने कल देत सातपैकी पाच जागांवर उमेदवार निवडून दिले. विजयी उमेदवारांत जनाबाई यादव, शीतल महानवर, शिवहारी महानवर, गोदाबाई यादव, प्रगती शिंदे हे डोंग्रीबा परिवर्तन विकास पॅनलचे तर विरोधी पॅनलचे काशीबाई कांबळे व अलका शिंदे हे उमेदवार विजय झाले.