तुळजाभवानीच्या दानपेटीत चार काेटींचं दान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 07:23 AM2022-10-10T07:23:31+5:302022-10-10T07:24:11+5:30

महाराष्ट्रासाेबतच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, आदी राज्यांतून लाखाेंच्या संख्येने भाविक दाखल झाले हाेते.

Donation of four crores in Tulja Bhavani donation box | तुळजाभवानीच्या दानपेटीत चार काेटींचं दान

तुळजाभवानीच्या दानपेटीत चार काेटींचं दान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
उस्मानाबाद : यंदा श्री तुळजाभवानीचा शारदीय नवरात्राेत्सव उत्साहात पार पडला. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, आदी राज्यातील लाखाेंच्या संख्येने भाविकांनी देवीच्या चरणी माथा टेकवत दानपेटीत भरभरून दान टाकले आहे. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टाेबर या कालावधीत राेख देणगी व विविध स्वरूपात सुमारे ४ काेटी ५६ हजार ४६४ रुपये ३२ पैसे एवढे दान जमा झाले. 

महाराष्ट्रासाेबतच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, आदी राज्यांतून लाखाेंच्या संख्येने भाविक दाखल झाले हाेते. या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर दानपेटीतही भरभरून दान टाकले आहे. नऊ दिवसांच्या कालावधीत विविध स्वरूपात तब्बल ४ काेटी ५६ हजार ४२६ रुपये जमा झाले आहेत. यामध्ये रोख देणगीद्वारे १ कोटी ६७ लाख ९६ हजार २०० रुपये, सिंहासन पेटीमध्ये १ कोटी ५ लाख ३७ हजार ९७० रुपये, दानपेटीत ७२ लाख ६३ हजार ३० रुपये,  विश्वस्त निधीत १८ लाख २१ हजार ३७५ रुपये, मनी ऑर्डरच्या माध्यमातून २ लाख ४६ हजार ३३५ रुपये,  धनादेश देणगीद्वारे ८७ हजार ४६९ रुपये, ऑनलाइन देणगीतून ५१ हजार, नगदी अर्पण २२ हजार ११४ रुपये यासह इतर उत्पन्न मिळाले आहे. 

लिलावातून मिळाले 
६२ लाख... 

लिलावापाेटी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला ६२ ९६ हजार ८८० रुपये एवढे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये हाेमशाळा पावतीपाेटी ५४ लाख ४६ हजार ८८० रुपये, तुळजा विश्राम धाम ३ लाख ५० हजार, तर शिधा पावतीपाेटी पाच लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे नवरात्रातील एकूण उत्पन्नाचा आकडा ४ काेटी ६३ लाख ५३ हजार ३४४ रुपयांवर 
पाेहाेचला आहे.

Web Title: Donation of four crores in Tulja Bhavani donation box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.