‘माझा गाव, सुंदर गाव’चा जिल्हास्तरीय शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:19 IST2021-02-05T08:19:37+5:302021-02-05T08:19:37+5:30

आपसिंगा -राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सुरुवात तुळजापूर : ‘माझा गाव, सुंदर गाव’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा ...

District level launch of 'My Village, Beautiful Village' | ‘माझा गाव, सुंदर गाव’चा जिल्हास्तरीय शुभारंभ

‘माझा गाव, सुंदर गाव’चा जिल्हास्तरीय शुभारंभ

आपसिंगा -राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सुरुवात

तुळजापूर : ‘माझा गाव, सुंदर गाव’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाले. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, उपायुक्त सुरेश बेदमुथा, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फंड, जि.प.चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य धीरज पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती. याप्रसंगी दिव्यांग कल्पना निधीसाठी ग्रामपंचायतीच्या ५ टक्के निधीतून धनादेश वितरित करण्यात आले. साेबतच गावातील प्रत्येक कुटुंबासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गट विकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, विलास खिल्लारे, तायडे, ग्रामसेवक चैतन्य गोरे, सरपंच वैशाली गोरे, उपसरपंच दीपक सोनवणे, माजी कृषी अधिकारी हणमंत गोरे, शंकर गोरे, ग्रा. पं. सदस्य अमीर शेख, सचिन जाधव, अजित क्षीरसागर, शक्ती पांडागळे, महादेव कसबे, महेश पवार आदींची उपस्थिती हाेती. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी मानले. सूत्रसंचालन हनुमंत गादगे यांनी तर आभार अमीर शेख यांनी मानले.

चाैकट...

अभियान यशस्वी करा - पाटील

‘माझा गाव, सुंदर गाव’ हे अभियान गावांचा चेहरा-माेहरा बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे गावस्तरीय यंत्रणेसाेबतच ग्रामस्थांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. एकात्मिक विकास आराखडा तयार केल्याशिवाय गावचा खऱ्या अर्थाने विकास हाेणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन करा

प्रत्येक गावाने चांगले काम केल्यास त्याचे फलित नक्कीच मिळते. त्यामुळे प्रशासनाला ग्रामस्थांनी खंबीर साथ दिल्यास हे अभियान यशस्वी हाेईल. यासाेबतच प्रत्येक कुटुंबाने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर द्यावा, असे आवाहनही अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी केले.

कर्मचाऱ्यांनी लाेकसेवक म्हणून काम करावे

प्रत्येकाने आपल्यातील ‘मी’ला दूर करावे. मन प्रसन्न ठेवून काम केले पाहिजे. सर्व अधिकारी व कर्मचारी लाेकसेवक आहे. त्यांनी लाेकसेवक म्हणूनच काम करावे. आपला अनुभव व ज्ञानाद्वारे गाव सुंदर करावे, असे आवाहन सीईओ डाॅ. विजयकुमार फड यांनी केले.

Web Title: District level launch of 'My Village, Beautiful Village'