जिल्हा आराेग्य अधिकारी वडगावे यांची लातूर येथे बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:01+5:302021-08-18T04:39:01+5:30
जिल्हा परिषद-‘आराेग्य’ची धुरा आता नितीन बाेडके यांच्या हाती उस्मानाबाद - जिल्हा परिषदेचे जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. हणमंत वडगावे यांची ...

जिल्हा आराेग्य अधिकारी वडगावे यांची लातूर येथे बदली
जिल्हा परिषद-‘आराेग्य’ची धुरा आता नितीन बाेडके यांच्या हाती उस्मानाबाद - जिल्हा परिषदेचे जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. हणमंत वडगावे यांची लातूर येथे विनंतीनुसार बदली झाली आहे. त्यांच्या जागी नंदूरबार जिल्हा परिषदेचे डाॅ. नितीन बाेडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डाॅ. वडगावे यांनी तब्बल चार वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या व विनातक्रार पूर्ण केला.
जिल्हा आराेग्य अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर डाॅ. वडगावे यांनी आराेग्य केंद्रांच्या बळकटीकरणावर भर दिला. ग्रामीण भागातील एकही मूल लसीकरणाशिवाय राहणार नाही, यावर त्यांची करडी नजर असे. दाेन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर काेराेनासाखे गंभीर संकट ओढावले. या संकटातही ग्रामीण भागातील आराेग्य सुविधा अधिकाधिक बळकट कशा हाेतील, त्यावर भर दिला. उपकेंद्र, प्राथमिक आराेग्य केंद्र, तालुका आराेग्य अधिकारी कार्यालये यांच्यात समन्वय राखण्यावरही त्यांचा नेहमी भर असे. त्यांच्या या नियाेजनामुळेच बहुतांश आराेग्य केंद्रातील ओपीडी वाढली. दरम्यान, काेराेनाच्या संकटकाळात हवालदिल झालेल्या ग्रामीण भागातील लाेकांकडून अनेक वेळ थेट डाॅ. वडगावे यांच्याशी संपर्क केला जात हाेता. त्यांना तेवढ्याच तत्परतेने जिल्हा स्तरावरूनही प्रतिसाद मिळत हाेता. त्यामुळे फाेनकाॅलचे प्रमाण वाढले हाेते. जवळपास चार वर्षे जिल्ह्यात जिल्हा आराेग्य अधिकारी म्हणून डाॅ. वडगावे यांनी विनातक्रार यशस्विरित्या सेवा पार पडली. बदलीसाठी त्यांनी राज्य सरकारकडे विनंती केली हाेती. त्यानुसार शासनाने त्यांची लातूर जिल्हा आराेग्य अधिकारी म्हणून बदली केली आहे. त्यांच्या जागी नंदूरबार जिल्हा परिषदेचे जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. नितीन दशरथ बाेडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्या रूपाने उस्मानाबादला नवे ‘डीएचओ’ मिळाले आहेत.