तीनशे कुटुंबांना स्टीमरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST2021-05-19T04:33:31+5:302021-05-19T04:33:31+5:30
लोहारा : तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे युवकांनी लोकसहभागातून तीनशे कुटुंबांना ४० हजार रुपये किमतीचे स्टीमर मंगळवारी वाटप केले. लोहारा ...

तीनशे कुटुंबांना स्टीमरचे वाटप
लोहारा : तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे युवकांनी लोकसहभागातून तीनशे कुटुंबांना ४० हजार रुपये किमतीचे स्टीमर मंगळवारी वाटप केले.
लोहारा खुर्द येथील राममंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी एस. ए. अकेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, सरपंच सचिन रसाळ, निळकंठ पाटील, ग्रामसेवक जी. डी. कोकाटे, पोलीस पाटील बिरूदेव सूर्यवंशी, विकास सोसायटीचे चेअरमन मुकुंद इंगळे, माजी चेअरमन भास्कर रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकसहभाग व नावीन्यपूर्ण संकल्पनेतून मदत करण्याचे आवाहन बालाजी सूर्यवंशी यांनी केले होते. याला प्रतिसाद देत नितीन सूर्यवंशी, खंडू आरगडे, व्यंकटेश सूर्यवंशी, प्रकाश हरिश्चंद्र रसाळ, नरहरी पाटील, प्रल्हाद रसाळ, शिवाजी पाटील, शिवाजी रसाळ, बालाजी पाटील, शिवशंकर लोखंडे, अमर जाधव, आप्पाराव सूर्यवंशी आदींनी ४० हजार रुपयांची मदत केली. यातून कोरोना महामारीच्या संकटापासून सुरक्षित राहण्यासाठी व आरोग्याची काळजी घेण्यासाठी गावातील गरजू ३०० कुटुंबांना स्टीमरचे वाटप करण्यात आले. यासाठी नारायण सूर्यवंशी, अजय रसाळ, सचिन बाळू रसाळ, खंडेराव मुरटे, सुग्रीव पाटील, विकास प्रकाश पाटील यांच्यासह स्वप्नपूर्ती समूहाचे अरविंद रसाळ, श्रीहरी रसाळ, राजमुद्रा समूहाचे अर्जुन रसाळ, हणमंत मुरटे, अजय रसाळ, रोहन जमादार, भास्कर रसाळ, गणेश पाटील यांनी पुढाकार घेतला.
फोटो - लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथे स्टीमरचे वाटप करताना गटविकास अधिकारी एस. ए. अकेले, सरपंच सचिन रसाळ, सुनील साळुंखे, निळकंठ पाटील, जी. डी. कोकाटे, बिरूदेव सूर्यवंशी आदी.