शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

झुंजार नेतृत्व हरपले

By admin | Updated: June 4, 2014 01:33 IST

उस्मानाबाद : मैत्रीचा ओलावा कायम जपणारा मित्र आणि शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांसह बहुजनांच्या प्रश्नासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणारा नेता म्हणून गोपीनाथ मुंडे सर्व परिचित होते़

 उस्मानाबाद : माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लोकनेता म्हणून उदयास येत असलेले गोपीनाथ मुंडे यांची ग्रामीण मातीशी जुळलेली नाऴ़ कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थाऩ़ राजकीय पटलावर विरोधकांना सळो की पळो करून सोडताना मैत्रीचा ओलावा कायम जपणारा मित्र आणि शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांसह बहुजनांच्या प्रश्नासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणारा नेता म्हणून गोपीनाथ मुंडे सर्व परिचित होते़ मात्र, संघर्षातून झेपावणार्‍या या नेत्यावर काळाने अचानक झडप घातल्याने मराठवाडा पोरका झाल्याच्या दु:खद भावना उस्मानाबादेतील सर्वपक्षीय नेतेमंडळी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी व्यक्त केल्या़ केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी वार्‍यासारखी जिल्ह्यात पसरताच शहरी भागासह ग्रामीण भागातील अनेक गावात स्वयंस्फूर्तपणे बंद पाळण्यात आला़ ठिकठिकाणी गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली़ भाजपाच्याच नव्हे तर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनाची झालेली घालमेल, खरोखरच अपघात झाला का ? असा पडलेला प्रश्न आणि अपघातानंतर दिल्ली, मुंबईत घडणार्‍या घटना आणि बुधवारी होणार्‍या अंत्यविधीकडे सर्वांचे लक्ष लागून होते़ विरोधी पक्षातील नेतेमंडळींच्या जिवालाही मुंडे यांच्या अपघाती निधनाने चटका लावला होता़ उस्मानाबाद शहरातील शिवाजी चौकात सर्वपक्षीयांच्या वतीने सकाळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली़ माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे संजय निंबाळकर, मिलिंद पाटील, नितीन काळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील, उपनगराध्यक्ष अमित शिंदे, जिप उपाध्यक्ष संजय पाटील, नितीन बागल, बंटी मंजुळे, इंद्रजित देवकते, अरविंद गोरे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ उस्मानाबादसह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण भागातही बंद पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली़ लोहारा शहरात कडकडीत बंद लोहारा : शहर व परिसरावर शोककळा पसरली. व्यापार्‍यांनी आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. त्यानंतर येथील शिवाजी चौकामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुधीर घोडके, उपसरपंच अभिमान खराडे, शाम नारायणकर, दीपक मुळे, माणिक बिराजदार, अशोक तिगाडे, पप्पू मुळे, दयानंद शेवाळे, आयुब शेख, सलीम शेख, बाळासाहेब कोरे, रवि कुलकर्णी, संतोष कुंभार, शिवा बंडगर, विजय महानुर, विश्वास जेवळीकर आदी उपस्थित होते. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे शहरातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय आदी शासकीय कार्यालयातही शुकशुकाट पहावयास मिळाला. सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली परंडा : शहरातील शिवाजी चौकात एकत्र येवून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण केली. येथील पंचायत समिती सभागृहात सर्वपक्षीयांच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, वासूदेवराव देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, काँग्रेसचे श्रीकांत भालेराव, अ‍ॅड. सुभाष मोरे, दादासाहेब खरसडे, नगरसेवक जाकीर सौदागर, अ‍ॅड. महाजन, भाजपा उपजिल्हाध्यक्ष रामभाऊ चौधरी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गोपाळ ठाकूर, युवा सेना तालुका उपाध्यक्ष माऊली गोडगे, सुबोधसिंह ठाकूर, संभाजी ब्रिगेडचे मनोज कोळगे, रा.काँ. चे शहराध्यक्ष वाजीद दखनी, माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी, शब्बीरखाँ पठाण, संदीप शहा, संजयकुमार बनसोडे, विकास कुलकर्णी, अजित पाटील, सूर्यकांत बोराडे, अ‍ॅड. जहीर चौधरी, अब्दुल शेख आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. अणदुरात शोकसभा अणदूर : येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सकाळी १० वाजता शोकफेरी काढून शोकसभा घेण्यात आली. यावेळी माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे यांच्यासह लिंबाजी सुरवसे, अ‍ॅड. दीपक आलुरे, बाळकृष्ण घोडके, शिवाजी घुगे, महादेव नरे, हनुमंत घुगे, रमेश मोकाशे, माणिक आलुरे, राजेंंद्र स्वामी, अमोल गुड्ड, अरविंद घोडके, श्रीमंत मुळे, डॉ. अनिता मुदकण्णा, डॉ. शशिकांत अहंकारी यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी सरपंच शशिकला शेटे, भुजंगराव घुगे, साहेबराव घुगे, संजीवनी आलुरे, बाबूराव कुलकर्णी, सुनीता कुलकर्णी, संगप्पा हगलगुंडे आदींची उपस्थिती होती. भूम शहरावर शोककळा भूम : शहरातील गोलाई चौकामध्ये सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजपाचे बाळासाहेब क्षीरसागर, आदम शेख, श्रीराम मुळे, महेश प्रतापे, शिवसेनेचे अनिल शेंडगे, दिलीप शाळू, मनसेचे दिलीप शेंडगे, काँग्रेसचे बाळासाहेब पाटील होंडोग्रीकर, रोहन जाधव, रमेश माळी, सोपान वरवडे, आरपीआयचे सुनील थोरात आदींची उपस्थिती होती. मंत्री झाल्यानंतर दहाव्या दिवशीच ‘एक्झिट’... कळंब : शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व नागरिकांच्या वतीने स्वा. सावरकर पुतळ्यासमोर श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ, उद्धव पडवळ, उपनगराध्यक्ष पांडुरंग कुंभार, नगराध्यक्ष शिवाजी कापसे, प्रा. साहेबराव बोंदर आदींची यावेळी उपस्थिती होती. खा. मुंडेंच्या निधनाचे वृत्त समजताच व्यापार्‍यांनी आपापली दुकाने बंद ठेवली. श्रद्धांजली सभेमध्ये पदाधिकार्‍यांनी मुंडेंच्या आठवणी व त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला. उमरगा : शहर बाजारपेठ बंद ठेवून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य कैैलास शिंदे, तालुकाध्यक्ष माधव पवार, नेताजी गायकवाड, डॉ. कपिल महाजन, जितेंद्र शिंदे, नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, बाबूराव शहरापुरे, मोहन पनुरे, जि.प.सदस्य दिलीप भालेराव, युकाँचे विजय वाघमारे, सिद्रमप्पा चिंचोळे, सचिव हरिप्रसाद चांडक, राष्टÑवादीचे जाफर कारचे, नितीन होळे, शिवसेनेचे संतोष सगर, रत्नाकांत सगर, गोपाळ आष्टे, डॉ. तावशीकर, अनिलकुमार धारूरकर, आरपीआयचे दत्ता रोंगे, दत्तू कटकधोंड, सुनील कुलकर्णी, प्रा. संजय अस्वले, अंबादास जाधव, यशवंत चंदनशिवे, रमेश माने, दिलीपसिंह गौतम, नगरसेवक बालाजी सुरवसे आदींची उपस्थिती होती.