एका मताची 'जादू' ! ढोकीत भाजप उमेदवाराचा अवघ्या १ मताने पराभव; उद्धवसेनेचे समुद्रे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:37 IST2026-02-09T11:36:29+5:302026-02-09T11:37:16+5:30

अवघ्या एका मताच्या फरकाने गुलाल उद्धवसेनेच्या पदरात पडला.

Dharashiv ZP Result 2026: The 'magic' of one vote! BJP candidate defeated by just 1 vote in Dhoki Panchayat Samiti Gan; Congress's Amar Samudre wins | एका मताची 'जादू' ! ढोकीत भाजप उमेदवाराचा अवघ्या १ मताने पराभव; उद्धवसेनेचे समुद्रे विजयी

एका मताची 'जादू' ! ढोकीत भाजप उमेदवाराचा अवघ्या १ मताने पराभव; उद्धवसेनेचे समुद्रे विजयी

धाराशिव: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल समोर येत असताना धाराशिव जिल्ह्याने राज्याला थक्क करणारा निकाल दिला आहे. ढोकी पंचायत समिती गणात लोकशाहीच्या ताकदीचे सर्वात थरारक चित्र पाहायला मिळाले. येथे भाजप उमेदवार निहाल काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला असून उद्धवसेनेचे अमर समुद्रे यांनी निसटता पण ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

श्वास रोखायला लावणारी मतमोजणी 
ढोकी गणात सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळत होती. मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. मतमोजणीअंती उद्धवसेनेचे उमेदवार अमर समुद्रे यांना ३१८७ मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार निहाल काझी यांना ३१८६ मते मिळाली. अवघ्या एका मताच्या फरकाने गुलाल काँग्रेसच्या पदरात पडला. निहाल काझी यांना मिळालेल्या या पराभवाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

ढोकी गटात 'मशाल' पेटली! 
पंचायत समिती गणात काँग्रेसने बाजी मारली असली, तरी ढोकी जिल्हा परिषद गटातून उद्धवसेनेचे उमेदवार तीर्थराज घाडगे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. घाडगे यांनी सुमारे १२०० मतांच्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. एका बाजूला एक मताचा थरार आणि दुसऱ्या बाजूला हजारांची आघाडी, अशा दोन्ही टोकाच्या निकालांनी ढोकीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

Web Title : एक वोट का जादू! ढोकी में भाजपा उम्मीदवार एक वोट से हारे।

Web Summary : रोमांचक मुकाबले में, ढोकी पंचायत समिति चुनाव में कांग्रेस उम्मीदवार एक वोट से जीता, भाजपा को चौंका दिया। वहीं, जिला परिषद सीट पर उद्धव सेना के उम्मीदवार ने भारी जीत हासिल की, जिससे ढोकी में विपरीत चुनावी नतीजे सामने आए।

Web Title : One-vote magic! BJP candidate loses by one vote in Dhoki.

Web Summary : In a nail-biting finish, the Congress candidate won by a single vote in Dhoki Panchayat Samiti election, stunning the BJP. Meanwhile, in the Zilla Parishad seat, the Uddhav Sena candidate secured a landslide victory, showcasing contrasting electoral outcomes in Dhoki.