Dharashiv ZP Election 2026: राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले असतानाच, धाराशिवमध्ये एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी आपल्याच एका जुन्या कार्यकर्त्याला जाहीर सभेत थेट चौकशी लावण्याची धमकी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा कार्यकर्ता आता बंडखोर उमेदवार म्हणून रिंगणात आहे.
बंडखोरीमुळे माजी मंत्र्यांचा पारा चढला
धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत तानाजी सावंत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांच्याच तालमीत तयार झालेला एक जुना कार्यकर्ता पक्ष आदेश डावलून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सावंत यांचा संताप अनावर झाला. भाषणादरम्यान त्यांनी या बंडखोर उमेदवाराचा उल्लेख करत, थांब, तुझ्यावर एन्क्वायरी लावतो, असा जाहीर दम भरला. तानाजी सावंत यांनी प्रशासकीय चौकशीचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेवरून संताप
केवळ बंडखोरीच नाही, तर स्थानिक नागरी समस्यांवरूनही तानाजी सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "आता मी या रस्त्याने आलो. या ठिकाणचा एक उमेदवार स्क्रिनवर दाखवतोय की हा रस्ता त्याने केला. तुझ्या बापाने केला का? हा महाराष्ट्र शासनाचा निधी तानाजी सावंतने आणला. रस्त्याची अवस्था काय झाली बघितली मी येताना. त्याची एन्क्वायरी लावतो तू बघ आता. तुमच्याकडे जे आहे त्याच्या दहा पट माझ्याकडे आहे. तुमच्या मनगटात दम असेल तर त्याच्या १०० पट दम माझ्यात आहे. माझा नाद करायचा नाही. मी मी करणाऱ्यांची मी जिरवली आहे हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र फिरलेला हा तानाजी सावंत आहे," असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला.
Web Summary : Ex-minister Tanaji Sawant threatened a rebel candidate with an inquiry at a rally due to defiance and road issues. He asserted his power and warned against challenging him, causing political stir.
Web Summary : पूर्व मंत्री तानाजी सावंत ने एक रैली में बागी उम्मीदवार को बगावत और सड़क के मुद्दों के कारण जांच की धमकी दी। उन्होंने अपनी शक्ति का दावा किया और चुनौती देने के खिलाफ चेतावनी दी, जिससे राजनीतिक हलचल हुई।