शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

काळ कोठून येईल सांगता येत नाही! अनियंत्रित भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 19:24 IST

या भीषण अपघातात माजी नगरसेवकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला

उमरगा (जि. धाराशिव): सोलापूर-हैदराबाद महामार्गावर जकेकूर चौरस्त्याजवळ मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही कार थेट रस्त्याकडेला असलेल्या हॉटेलमध्ये घुसली. या दुर्घटनेत हॉटेलबाहेर बसलेले माजी नगरसेवक बळीराम पवार आणि व्यावसायिक लाडनशहा मूर्शीद यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

गप्पा मारत बसले अन् काळ धावून आलामिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक तथा प्रसिद्ध गुत्तेदार बळीराम कुशाप्पा पवार (४८) आणि 'जनता अर्थ मुव्हर्स'चे मालक लाडनशहा मूर्शीद (५२) हे दोघे आपल्या काही मित्रांसह जकेकूर चौरस्त्यावरील एका हॉटेलबाहेर लिंबाच्या झाडाखाली गप्पा मारत बसले होते. याचवेळी सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या कारचे (क्र. TS 34 F 4706) टायर फुटले. कार इतक्या वेगात होती की, चालकाचे नियंत्रण सुटून ती महामार्गापासून दूर अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये घुसली.

दोन जखमींची प्रकृती चिंताजनकया भीषण धडकेत बळीराम पवार आणि लाडनशहा मूर्शीद यांचा जागीच अंत झाला. तर सचिन भीमराव कुटार (२८) आणि हॉटेल चालक महादेव देडे (३०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर काहींनी कार आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून वेळीच धाव घेतल्याने त्यांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे, कारमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर इजा झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर उमरगा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Unforeseen Tragedy: Tire Blowout Causes Car to Crash, Killing Two

Web Summary : A tire blowout caused a car to crash into a roadside hotel near Umarga, killing former corporator Baliram Pawar and businessman Ladanshah Murshid. Two others were seriously injured in the accident. The car lost control and hit the hotel where people were chatting.
टॅग्स :dharashivधाराशिवAccidentअपघात