शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणात आणखी दोन तस्करांना बेड्या, दोघे फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:36 IST

१३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश

तामलवाडी (जि. धाराशिव) : एम. डी. ड्रग्ज प्रकरणात तपासाला आणखी गती देत तामलवाडी पोलिसांनी आणखी दोन ड्रग्ज तस्करांना गजाआड केले आहे. हे दोन्ही आरोपी पुणे व सोलापूर शहरातील आहेत. त्यांना सोमवारी न्यायालयाने १३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तुळजापूर शहरासह सोलापूर, पुणे शहरात ड्रग्ज तस्करांचे कनेक्शन उघड झाले आहे. तामलवाडी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. स्वराज ऊर्फ पिनू तेलंग (रा. तुळजापूर) व वैभव गोळे (रा. मुंबई) हे दोघे फरार आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात आणखी दोन तस्करांची नावे पोलिसांसमोर आली. त्यांच्यावर पाळत ठेऊन सोमवारी पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

पुणे येथील सुलतान ऊर्फ टिपू शेख यास तो सध्या वास्तव्यास असलेल्या नळदुर्ग शहरातून ताब्यात घेण्यात आले. तर जीवन नागनाथ साळुंके (रा. सलगर वस्ती, सोलापूर) यास सोलापूर शहरातून सोमवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. या दोघांनाही न्यायालयाने १३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात तुळजापूर येथील आणखी एक आरोपी निष्पन्न झाला असून, तो सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सपोनि गोकुळ ठाकूर हे करीत आहेत.

गांजा पिताना पकडला आरोपीतामलवाडी पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलेला आरोपी सुलतान उर्फ टिपू शेख हा गांजाचे सेवन करताना सापडला. नळदुर्ग पोलिसांची रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग सुरु असताना नळदुर्ग-अक्कलकोट रोडवरील एका फंक्शन हॉलसमोर हा आरोपी गांजा पीत असल्याने दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो ड्रग्ज तस्करीतही सक्रिय असल्याचे समजल्यानंतर आरोपीचा ताबा तामलवाडी पोलिसांकडे देण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थdharashivधाराशिव