शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: ९५ हजार रुपयांची घेतली लाच; PI मारुती शेळके, कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:17 IST

धाराशिव लाचलुचपत विभागाने बुधवारी लाच स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके, महिला पोलिस कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे यांना रंगेहाथ पकडून अटक करत दोघांवर गुन्हा दाखल केला होता.

धाराशिव : ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके, महिला पोलिस कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे यांना सेवेतून निलंबित केले. मुलाला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी पोलिस दलातील महिला कॉन्स्टेबलकडून ९५ हजार रुपयांची लाच घेण्यात आली होती. या दोघांच्याही अटकेनंतर शुक्रवारी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या सूचनेनुसार पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दोघांनाही निलंबित केले.

धाराशिव लाचलुचपत विभागाने बुधवारी लाच स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके, महिला पोलिस कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे यांना रंगेहाथ पकडून अटक करत दोघांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरीक्षक शेळके यांना गुरुवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने शेळके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठवला होता. त्यानुसार ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी लाच घेताना अटक करण्यात आल्यानंतर शेळके पोलिसांच्या ताब्यातून पळून गेले होते. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पुन्हा पकडले. या घटनेमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

कळंबमधील कारकिर्दीची चर्चा...मारुती शेळके कळंब येथे कार्यरत असतानाही त्यांनी काही प्रकरणांमध्ये असेच उद्योग केल्याची चर्चा होती. धाराशिव ग्रामीणला रुजू झाल्यानंतर येथेही ते उद्योग कायम ठेवले. अखेर घडा भरल्यानंतर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. सध्या कळंबमध्ये त्यांच्या तेथील कारकिर्दीची चवीने चर्चा केली जात आहे.

टॅग्स :dharashivधाराशिवAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारीsuspensionनिलंबन