शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांची लूट; बनावट जॉईनिंग लेटर देऊन उकळले लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:17 IST

वाशीत ६ तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन फसवलं; मुंबईतील रॅकेटचा पर्दाफाश?

वाशी : शासकीय नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून ६ सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून १५ लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार वाशी येथे समोर आला आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या फसवणुकीचे धागेदोरे मोठ्या रॅकेटपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाशी येथील बाळासाहेब पंडितराव सुकाळे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. सुकाळे यांचा मुलगा आणि इतर ५ तरुणांना शासकीय नोकरी लावण्याचे प्रलोभन आरोपींनी दिले होते. १७ मे २०२४ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत हा सर्व व्यवहार झाला. आरोपींनी केवळ पैसेच घेतले नाहीत, तर या तरुणांना खोटी जॉईनिंग लेटर्स (नियुक्तिपत्रे) सुद्धा दिली. मात्र, ही पत्रे बनावट असल्याचे लक्षात येताच आपल्याला फसविले गेल्याचे या तरुणांच्या लक्षात आले. सुकाळे यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. सततच्या पाठपुराव्यानंतर ३ लाख १५ हजार रुपये परत केले, मात्र उर्वरित ११ लाख ८५ हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. इतकेच नव्हे तर, पैसे मागितल्यास सुकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांना धमकावण्यात आले. आरोपींचा शिरजोरपणा वाढल्याने शेवटी सुकाळे यांनी २४ फेब्रुवारी रोजी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी संबंधित आराेपींविरुद्ध वाशी पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे अधिक तपास करत आहेत.

अशा प्रकारे उकळले पैसेनवाब उर्फ रईसोद्दीन हमीद काझी (वाशी) याने काही रक्कम रोख स्वरूपात घेतली.संदीप चंद्रकांत चांदिवडेकर (मुंबई) याच्या ‘फोन पे’ नंबरवर काही रक्कम पाठवण्यात आली.उर्वरित रक्कम ‘श्री स्वामी समर्थ’ या नावाच्या बँक खात्यावर जमा करून घेण्यात आली.

यांच्यावर झाला गुन्हा दाखलनवाब उर्फ रईसोद्दीन हमीद काझी (रा. वाशी), संदीप चंद्रकांत चांदिवडेकर (रा. मुंबई), सनी (रा. मुंबई, पूर्ण नाव माहित नाही), स्वप्निल मोरे (रा. मुंबई) यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा कंपनीला नोकरीसाठी पैसे देऊ नका. नोकरीच्या अशा जाहिराती संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.शंकर शिंदे, पोलिस निरीक्षक, वाशी.

English
हिंदी सारांश
Web Title : Job seekers defrauded: Fake letters used to steal lakhs.

Web Summary : Unemployed youths in Vashi were cheated of ₹15 lakhs with fake job offers and appointment letters. Police are investigating a potential racket, and four individuals have been charged. Victims were also threatened when they demanded their money back.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिवfraudधोकेबाजी