शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

पैसे गेले कुठे? ७० लाख खर्चूनही भूमकर तहानलेलेच; पहाटे मोटार जळाली अन् 'पाणी' पेटलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 18:59 IST

भूम पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ७० हजार नागरिकांना

भूम (जि. धाराशिव): प्रशासकीय काळात पाणीपुरवठा विभागावर ७० लाख ३९ हजार ६२ रुपये खर्च झाल्याचा दावा केला जात असतानाच, शहरातील दुसरी मोटार गेली पाच वर्षे दुरुस्त न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. २८ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता सुरू असलेल्या एकमेव मोटारीत अचानक बिघाड झाल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला. या घटनेने पालिकेच्या ७० लाखांच्या खर्चावर आणि नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नगरसेवकांचा तलावावर ठिय्यापाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा सभापती नवनाथ रोकडे, गटनेते रुपेश शेंडगे, नगरसेवक आबासाहेब मस्कर आणि चंद्रमणी गायकवाड यांनी वंजारवाडी तलावावरील जॅकवेलवर धाव घेतली. यावेळी आबासाहेब मस्कर यांनी प्रशासकीय काळात अर्थसंकल्पातून पाणीपुरवठ्यावर झालेल्या खर्चाचा हिशोबच वाचून दाखवला. ७० लाख खर्चूनही पर्यायी मोटार सक्षम का नाही? असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

बिलासाठी मेकॅनिकची टाळाटाळधक्कादायक बाब म्हणजे, देखभाल करणाऱ्या मेकॅनिकचे १ लाख ४० हजार रुपयांचे बिल प्रलंबित असल्याने त्यांनी दुरुस्तीसाठी येण्यास सुरुवातीला नकार दिला होता. अखेर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले. यावरून पालिकेच्या आर्थिक नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगराध्यक्षांवर टीकेची झोड"शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना नगराध्यक्ष घटनास्थळी फिरकले नाहीत. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रथम नागरिक दुर्लक्ष करत आहेत," असा आरोप गटनेते रुपेश शेंडगे यांनी केला आहे. १ मार्चपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असले, तरी या विषयावरून भूममध्ये आता राजकीय वातावरण तापले आहे.

टॅग्स :Waterपाणीdharashivधाराशिव