Dharashiv: अल्पवयीन मुलीवर ७ वर्षे लैंगिक अत्याचार, गर्भनिराेधक गोळ्या देऊन दुष्कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:33 IST2025-06-18T14:32:13+5:302025-06-18T14:33:33+5:30

धक्कादायक प्रकार, तरुणासह मदत करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

Dharashiv: Minor girl sexually abused for 7 years, abused by giving birth control pills | Dharashiv: अल्पवयीन मुलीवर ७ वर्षे लैंगिक अत्याचार, गर्भनिराेधक गोळ्या देऊन दुष्कृत्य

Dharashiv: अल्पवयीन मुलीवर ७ वर्षे लैंगिक अत्याचार, गर्भनिराेधक गोळ्या देऊन दुष्कृत्य

धाराशिव : जिल्ह्यातील एका गावातील अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच २४ वर्षीय तरुणाने सात वर्षाहून अधिक काळ वारंवार लैंगिक अत्याचार केला. या काळात आराेपीने पीडितेला गर्भनिरोधक गाेळ्या खाऊ घालून आपले दुष्कृत्य लपविण्याचा क्रूर प्रयत्न केल्याचेही समाेर आले आहे. या प्रकरणी आराेपी तरुणासह त्याला मदत करणाऱ्या महिलेच्या विराेधात पाेलिसांनी १६ जून राेजी नजीकच्या ठाण्यात गुन्हा नाेंदविला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एका गावातीलच चाेवीस वर्षीय आराेपीस पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना हाेती. तरीही त्याने तिच्यावर २०१७ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत म्हणजेच सात वर्षांपेक्षा अधिक काळ वारंवार लैंगिक अत्याचार केला. हे दुष्कृत्य लपविण्यासाठी त्याने पीडितेस गर्भनिराेधक गाेळ्या दिल्या. धक्कादायक बाब म्हणजे, या गुन्ह्यात एका दुसऱ्या महिलेचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. 

या महिला आरोपीने अल्पवयीन मुलीचे न ऐकता अपप्रेरणा देऊन नमूद तरुणास ‘‘तुम्हाला वाढदिवसाला एका रात्रीसाठी गिफ्ट देते’’ असे म्हटल्याचेही पीडितेने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी आराेपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ६४ (२)(एफ)(आय)(एम), ६९, ५५ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्याचे कलम ४, ६, १६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Dharashiv: Minor girl sexually abused for 7 years, abused by giving birth control pills