भयंकर! पत्नीला संपवलं, पोटच्या मुलीवरही चालवली कुऱ्हाड; मुलगा बाहेर पळाल्याने बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:21 IST2026-04-07T15:18:57+5:302026-04-07T15:21:16+5:30

मध्यरात्री संतापलेल्या बापाने संपवले कुटुंब; पत्नी आणि चिमुकलीचा खून करून पती पोलिसांत हजर

Dharashiv Crime: Double Murder in Umarga: Man Kills Wife and 8-Year-Old Daughter with Axe in Beradwadi. | भयंकर! पत्नीला संपवलं, पोटच्या मुलीवरही चालवली कुऱ्हाड; मुलगा बाहेर पळाल्याने बचावला

भयंकर! पत्नीला संपवलं, पोटच्या मुलीवरही चालवली कुऱ्हाड; मुलगा बाहेर पळाल्याने बचावला

उमरगा (जि. धाराशिव): उमरगा तालुक्यातील मुरूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेरडवाडी येथे सोमवारी मध्यरात्री रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अजित अणप्पा वासुदेव (वय ३०) याने किरकोळ वादातून आपली पत्नी लिंबाबाई (वय २४) आणि ८ वर्षांची मुलगी मानसी यांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, दुहेरी हत्याकांड घडवल्यानंतर आरोपी अजित मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास स्वतःहून मुरूम पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

४ वर्षांचा मुलगा घराबाहेर पळाला आणि वाचला
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा अजित आणि त्याची पत्नी लिंबाबाई यांच्यात जोरात भांडण सुरू झाले. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि अजितने घरात असलेल्या कुऱ्हाडीने पत्नी व मुलीवर सपासप वार केले. यावेळी त्यांचा ४ वर्षांचा लहान मुलगा घरातच होता, मात्र भांडण आणि रक्ताचा सडा पाहून तो प्रचंड घाबरला आणि घराबाहेर पळाला, ज्यामुळे त्याचे प्राण सुदैवाने वाचले. अजितला एकूण दोन मुली आणि एक मुलगा असून मोठी मुलगी आजोळी असल्याने ती या संकटातून बचावली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू, हत्येचे कारण अस्पष्ट
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सपोनि संदीप दहिफळे यांनी मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी मुरूम येथील शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. आरोपीने एवढे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंगळवारी उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. कौटुंबिक कलह की संशयाचे भूत, या दिशेने पोलीस आता सखोल तपास करत आहेत.

Web Title : धाराशिव में खौफ: शख्स ने पत्नी, बेटी की हत्या की; बेटा भागा

Web Summary : धाराशिव में एक शख्स ने घरेलू विवाद के बाद अपनी पत्नी और बेटी की कुल्हाड़ी से निर्मम हत्या कर दी। उनका छोटा बेटा भाग गया, जबकि पुलिस जांच कर रही है क्योंकि मकसद अभी भी अस्पष्ट है।

Web Title : Horror in Dharashiv: Man Murders Wife, Daughter; Son Escapes

Web Summary : In Dharashiv, a man brutally murdered his wife and daughter with an axe following a domestic dispute. Their young son escaped, while the motive remains unclear as police investigate the horrific crime.