शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
2
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
3
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
4
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
5
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
6
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
7
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
8
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
9
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
10
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
11
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
12
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
13
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
15
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
16
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
17
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
18
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
19
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
20
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधीच सरण रचलं गेलं! देवदर्शन घेऊन परतताना भावी पती-पत्नीला काळाने गाठलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:49 IST

कुलदैवताचे दर्शन ठरले शेवटचे; खंडोबाच्या दर्शनाहून परतताना काळाची झडप

जेवळी (जि. धाराशिव) : मे महिन्यात ज्यांच्या लग्नाची सनई वाजणार होती, त्या भावी पती-पत्नीवर काळाने झडप घातली आहे. नळदुर्गच्या खंडोबाचे दर्शन घेऊन परतताना झालेल्या भीषण अपघातात जेवळी पूर्व तांडा येथील बबन पवार आणि रोहिणी राठोड या जोडप्याचा अंत झाला. महामार्गावरील अर्धवट कामामुळे दोन सुखी संसारांची स्वप्ने क्षणात महामार्गावर विखुरली गेली आहेत.

बबन गोपा पवार (वय २६) हे मुंबईत फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वीच त्याचा रोहिणी बाबू राठोड (२२) यांच्याशी साखरपुडा झाला होता. घराचे बांधकाम सुरू असल्याने मे महिन्यात विवाह सोहळा पार पडणार होता. "कारखाना पट्टा पडला की मे महिन्यात लग्न करू," असे नियोजन दोन्ही कुटुंबांनी केले होते. लग्नाच्या याच आनंदात दोघेही रविवारी दुपारी नळदुर्गच्या खंडोबाचे दर्शन घेऊन घराकडे निघाले होते. दुपारी दोनच्या सुमारास दस्तापूर गावाजवळ मागून येणाऱ्या एका भरधाव टँकरने (एम.एच. ४२-एक्यू ६७९६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी ३० फूट फरफटत रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. या अपघातात बबनचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहिणीला मदतीसाठी श्यामसुंदर तोरकडे, अल्ताफ पटेल, अर्जुन दंडगुले व सहकाऱ्यांनी तातडीने जळकोट येथील रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

तांड्यावर शोककळाज्या घरात लग्नाची लगबग सुरू व्हायची, तिथे आता फक्त हुंदके आणि करुण आकांत ऐकू येत आहे. हळदीच्या आधीच या दोघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने जेवळी पूर्व तांडा परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले.

प्रशासनाच्या दिरंगाईने घेतला बळी?महामार्ग क्रमांक ६५ वर दस्तापूरजवळ डिव्हायडरसाठी जागा सोडण्यात आली आहे, मात्र हे काम कित्येक दिवसांपासून अर्धवट आहे. तिथे ना डिव्हायडर आहे, ना धोक्याचा कोणताही सूचना फलक. याच अर्धवट कामामुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या या दुर्लक्षामुळे दोन उमद्या तरुणांचे प्राण गेले असून, "आणखी किती बळी घेतल्यावर प्रशासनाला जाग येईल?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy Strikes: Couple Dies in Accident Before Wedding Day

Web Summary : A couple, soon to be married, tragically died in an accident while returning from a temple visit. Incomplete highway work is blamed for the accident, sparking outrage among villagers who question administrative negligence and demand accountability for the loss of young lives. The village mourns the devastating loss.
टॅग्स :dharashivधाराशिवAccidentअपघातDeathमृत्यू