उपनगराध्यक्ष मुंदडा यांना जिवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:38 IST2021-08-25T04:38:00+5:302021-08-25T04:38:00+5:30
कळंब शहरातील स्वा. सावरकर चौक ते नवीन सराफा लाईन भागातील रस्त्याचे काम सध्या चालू आहे. या भागात जुन्या भाजी ...

उपनगराध्यक्ष मुंदडा यांना जिवे मारण्याची धमकी
कळंब शहरातील स्वा. सावरकर चौक ते नवीन सराफा लाईन भागातील रस्त्याचे काम सध्या चालू आहे. या भागात जुन्या भाजी मार्केटच्या जागेत न. प. ने काही वर्षांपूर्वी दुकान गाळे बांधून ते भाडेतत्वावर दिले आहेत. या गाळ्यांसमोरील रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. यातील काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानाच्या पुढे कट्टे बांधून अधिकची जागा वापरात आणली आहे. आता रस्त्याचे काम करताना त्या कट्ट्यांचा अडथळा होत असल्याने संबंधित अधिकारी व कंत्राटदारांनी व्यापाऱ्यांना ते कट्टे हटवून घेण्यास सांगितले होते. मात्र, काही व्यापाऱ्यांनी कट्टे काढण्यास विरोध केला. याच कामाचा संदर्भ देत मुंदडा यांच्या घराच्या पत्त्यावर पोस्टाने हे धमकीपत्र पाठवण्यात आले आहे. ‘हा गाव लेवलचा मामला असून तुम्ही या भानगडीत पडू नका. काही लोक तुम्हाला गाठून हल्ला करणार आहेत’ असे या पत्रात म्हटले आहे. यामध्ये काही व्यापारी व त्यांचे नातेवाईक सहभागी असल्याचे तसेच एका समूहाचा उल्लेखही या पत्रात केला आहे.
चौकट -
विकासकामात तडजोड नाही -संजय मुंदडा
रस्त्याचे काम पुन्हा पुन्हा होणारे नाहीत. तो रस्ता बाजारपेठेतील मुख्य रस्ता आहे. अतिक्रमण केलेले कट्टे काढले तर पार्किंगचा, वाहतुकीचा प्रश्न मिटेल व तेथील व्यापाऱ्यांना ते सोईचे होईल, हीच आमची भूमिका आहे.त्यामुळे तेथील काम नियमानुसारच होईल, अशी माहिती उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी दिली.