उस्मानाबादेत रेल्वेखाली चिरडून अज्ञात प्रवासी महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 16:16 IST2019-01-12T16:14:50+5:302019-01-12T16:16:24+5:30
रेल्वे स्थानकावर उतरावयाचे असल्याने त्या महिलेने घाईगडबडीत रेल्वेतून खाली उडी मारली.

उस्मानाबादेत रेल्वेखाली चिरडून अज्ञात प्रवासी महिलेचा मृत्यू
उस्मानाबाद : रेल्वेखाली चिरडल्याने एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास उस्मानाबाद येथील रेल्वे स्थानकात घडली़
पुणे येथील रेल्वे स्थानकातून शुक्रवारी रात्री एक महिला (वय-४०) पनवेल- नांदेड या रेल्वेमध्ये बसून उस्मानाबादकडे येत होती़ ही रेल्वे शनिवारी पहाटेच्या सुमारास उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर आली़ प्रवासी उतरल्यानंतर रेल्वे पुढील मार्गावर मार्गस्थ होऊ लागली़ त्याचवेळी उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर उतरावयाचे असल्याने त्या महिलेने घाईगडबडीत रेल्वेतून खाली उडी मारली.
मात्र, रेल्वेखाली गेल्याने तिचा चिरडून मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळताच कुर्डूवाडी रेल्वे स्थानकातील पोउपनि महादेव दरेकर यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली़ उपस्थितांनी घटनेचा पंचनामा केला असून, या प्रकरणी कुर्डूवाडी रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.