पिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST2021-08-15T04:33:49+5:302021-08-15T04:33:49+5:30
राजेंद्र राम रसाळ (वय ५३) हे शनिवारी पहाटे सोयाबीन पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते; मात्र ते घरी परत ...

पिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
राजेंद्र राम रसाळ (वय ५३) हे शनिवारी पहाटे सोयाबीन पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते; मात्र ते घरी परत न आल्याने त्यांचे मोठे बंधू शिवाजी राम रसाळ हे त्यांना शोधण्यासाठी शेतात गेले. यावेळी विहिरीच्या काठावरील काँक्रीट केलेल्या जागेवर राजेंद्र हे झोपल्याचे त्यांना दिसून आले. त्यांना आवाज देऊन राजेंद्र यांना उठविण्याचा प्रयत्न केला; मात्र ते उठत नसल्याने जवळ जाऊन पाहिले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी शिवाजी रसाळ यांनी मुरुम पोलीस ठाण्यात भावाचा मृत्यू सर्पदंश किंवा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर येणेगूर दूरक्षेत्रचे पोहेकाॅ यशवंत सगर, पोना सुशांत मसाळ व भीमराव समुद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. मीरा भताने यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. घटनेची नोंद मुरुम पोलीस ठाण्यात झाली असून, तपास पोहेका यशवंत सगर करीत आहेत.