तेरखेडाजवळ जीपच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 16:16 IST2018-12-29T16:14:38+5:302018-12-29T16:16:10+5:30
औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तेरखेडा गावाजवळील वळणावर घडली़

तेरखेडाजवळ जीपच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्यांचा मृत्यू
वाशी ( उस्मानाबाद ) : भरधाव जीपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी दुपारी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तेरखेडा गावाजवळील वळणावर घडली़
वाशी येथील रामदास रंगनाथ जगताप (वय-६५) व त्यांच्या पत्नी निलावती रामदास जगताप (वय-६०) हे दोघे शनिवारी दुपारी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- ए़जी़५८४०) तेरखेडा येथील लग्न कार्यास जात होते़ ही दुचाकी औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तेरखेडा गावाजवळील वळणावर आली असता सोलापूरहून बीडकडे जाणाऱ्या जीपने (क्ऱएम़एच़१३- बी़एऩ६३७४) जोराची धडक दिली.
या अपघातात रामदास जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी निलावती जगताप यांना १०८ रूग्णवाहिकेतून रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला़ अपघाताची माहिती पोनि सतिश चव्हाण यांनी येरमाळा पोलिसांना दिली़ घटनास्थळाचा येरमाळा पोलिसांनी पंचनामा केला असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.