शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिवमध्ये क्रूरतेचा कळस! अमानुष मारहाणीनंतर मृत समजून तरुणाला रस्त्यावर फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:33 IST

हा तरुण मृत्यूशी झुंज देत असून, याप्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सोनारी (जि. धाराशिव) : भूम तालुक्यातील पाथ्रुड येथील एका १८ वर्षीय तरुणास क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ जणांनी रॉड, काठी तसेच तीक्ष्ण हत्याराने मारहाण केल्यानंतर मृत झाल्याचे समजून त्यास रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना मंगळवारी (दि. ११) उजेडात आली आहे. हा तरुण मृत्यूशी झुंज देत असून, याप्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

भूम तालुक्यातील पाथ्रुड येथील माउली बाबासाहेब गिरी असे अमानुष मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी परंडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास माउलीचा त्यास परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप व इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड, काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता. यानंतर त्यास फोन केला असता तो सातत्याने बंद लागत होता. यामुळे बस प्रवासात फिर्यादी वडिलांनी त्यांचे भाऊ व मित्राला याबाबतची माहिती देऊन शोध घेण्याची विनंती केली. दरम्यान, सायंकाळी ५ वाजता काळेवाडी येथील पोलिसपाटलांनी बाबासाहेब गिरी यांना फोन करून त्यांचा मुलगा माउली यास जबर मारहाण करून त्यास नग्नावस्थेत पश्चिम पांढरेवाडी ते कोकणे वस्ती रस्त्यालगत फेकून दिल्याचे सांगितले.

या माहितीवरून माउली याचा शोध घेऊन त्यास त्याच दिवशी जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांच्या उपचारानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यास सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान, याबाबत बाबासाहेब गिरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून परंडा ठाण्यात आरोपी सतीश जगताप व अन्य सहा ते सातजणांवर गुन्हा दाखल करून यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मंगळवारी परंडा ठाण्यातून मिळाली.

क्रूरतेचा गाठला कळसआरोपींनी माउली गिरी यास रॉडने पाठीपासून ते तळपायापर्यंत बेदम मारहाण केली आहे. शिवाय, गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने गंभीर इजा पोहोचविली आहे. तो बेशुद्ध झाल्यानंतर मृत झाल्याचे समजून नग्नावस्थेत त्यास पश्चिम पांढरेवाडी ते कोकणे वस्ती रस्त्यालगत फेकून दिले.

मारहाण प्रेमप्रकरणातून झाल्याची चर्चाआरोपींनी इतक्या क्रूरतेने माउली गिरी यास मारहाण का केली, याचा उलगडा अद्याप करण्यात आला नाही. तक्रारीतही त्याच्या वडिलांनी कारणाचा खुलासा केलेला नाही. असे असले तरी ही मारहाण प्रेमप्रकरणातून झाली असल्याची चर्चा होत आहे.

टॅग्स :dharashivधाराशिवCrime Newsगुन्हेगारी