शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

"खेकड्याला खाज खूप असते"; रोहित पवारांची तानाजी सावंतांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 11:15 IST

तानाजी सावंत यांनी खेडक्यामुळे धरण फुटल्याचं विधान केलं होतं. विशेष म्हणजे या विधानाचं त्यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं.

धाराशिव - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मराठवाडा दौऱ्याला सुरुवात केली आहे. धाराशिव मतदारसंघातून त्यांनी आता आपला दौरा सुरू केला असून संभाजीनगरमध्येही ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा संदेश घेऊन पोहोचत आहेत. रोहित पवारांनी धाराशिव दौऱ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच, कोरोना काळात ते राज्याचे आरोग्यमंत्री नव्हते, याचं समाधान असल्याचंही ते म्हणाले. पवार यांनी तानाजी सावंत यांच्या खेकडा आणि हाफकिन या विधानावरुन टीका केलीय. 

तानाजी सावंत यांनी खेडक्यामुळे धरण फुटल्याचं विधान केलं होतं. विशेष म्हणजे या विधानाचं त्यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं. तर, हाफकीन इंस्टीट्यूटबद्दलचेही त्यांचे विधान खूप गाजले होते. त्यानंतर, त्यांच्यावर टीकाही झाली होती. धाराशिवमध्ये रोहित पवार यांनी या दोन्ही विधानांचा उल्लेख करत सावंत यांच्यावर नाव न घेता टीका केली. 

''खेकड्याला खाज खूप असते, खेकडा जेव्हा खायचा असतो तेव्हा त्याची खाज उतरावी लागते. म्हणजे ती खाज आपल्याला येत नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. खेकड्याची उपमा देत त्यांनी सावंत यांना खोचक टोमणे लगावले. अधिवेशनामध्ये भाषण करत असताना, एक तर ते काय भाषण करतात हे कळत नाही. कोरोना काळात ते आरोग्यमंत्री नव्हते या गोष्टीचं समाधान आहे. ते जर कोरोना कालावधीत मंत्री असते. बाबा.. बा..बा... काय झालं असतं, असा खोचक टोलाही रोहित पवार यांनी लगावला. तर, आता खऱ्या अर्थाने हाफकिंगला बोलावण्याची वेळ आलीय, असेही त्यांनी म्हटले. 

घेऊन येतोय साहेबांचा संदेश असे म्हणत रोहित पवार यांनी मराठवाडा दौऱ्याला सुरुवात केली आहे. पहिल्यादिवशी धाराशिव आणि बीड दौरा केल्यानंतर आज ते लातूरमध्ये जात आहेत. लातूरुनंतर संभाजीनगर येथे त्यांचे दौरे होणार आहेत. या दौऱ्यात रोहित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. बैठकांचेही आयोजन करण्यात येत आहे. तसेच, येथील कार्यक्रमात भाषण करताना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर टीकाही करताना दिसून येतात.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना