उस्मानाबादेत काँग्रेसचे ‘निषेधासन’ आंदोलन; राज्य सरकारच्या चार वर्षाचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 19:03 IST2018-10-31T19:02:52+5:302018-10-31T19:03:03+5:30
या चार वर्षात भाजपाने केवळ आश्वासनांचे गाजर दाखविल्याचा आरोप करीत जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधासन आंदोलन करण्यात आले़

उस्मानाबादेत काँग्रेसचे ‘निषेधासन’ आंदोलन; राज्य सरकारच्या चार वर्षाचा केला निषेध
उस्मानाबाद : भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षात भाजपाने केवळ आश्वासनांचे गाजर दाखविल्याचा आरोप करीत जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधासन आंदोलन करण्यात आले़ भाजपा सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीनिमित्त युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडात गाजर धरून विविध ‘निषेधासने’ केली़
फडणवीस सरकार नसून फसवणीस सरकार असल्याची टीका यावेळी करण्यात आली़ केंद्रासह राज्य शासनाने मागील चार वर्षात जनतेची फसवणूक करत जाहिरातबाजी करून सर्वसामान्यांना लूटल्याचा आरोपही करण्यात आला़ युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वेगवेगळी आसने करीत शासनाच्या कारभाराचा निषेध नोंदविला़ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष रोहित पडवळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले़
यावेळी युवकचे प्रदेश निरीक्षक नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रविण देशमुख, सेवा दलाचे शाळू, अॅड़ दर्शन कोळगे, बालाजी बिदे, बलभीम जाधव, आयुब पठाण, अमर माने, बालाजी नेटके, विकी सोनटक्के, भैय्या निरफळ, राम कदम, बापू खटके, अॅड़ रणखांब, सुभाष हिंगमिरे, सदानंद जगदाळे, श्रीनाथ पडवळ, बाबा कसबे, आश्रुबा माळी, संजय घोगरे, आनंद घोगरे, सत्यजीत पंडित यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़