विवेक देबेरॉयच्या विरोधात कॉंग्रेस उतरली रस्त्यावर, फोटोचे दहन करुन नोंदविला निषेध
By सूरज पाचपिंडे | Updated: August 19, 2023 16:07 IST2023-08-19T16:04:54+5:302023-08-19T16:07:08+5:30
भाजप सरकार हाय हाय अशा जोरदार घोषणा देत बिबेक देबरॉय यांच्या प्रतिमेस जोडे मारुन दहन करण्यात आले.

विवेक देबेरॉयच्या विरोधात कॉंग्रेस उतरली रस्त्यावर, फोटोचे दहन करुन नोंदविला निषेध
धाराशिव : नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांनी नवीन संविधानाची मागणी करणारा लेख एका वृत्तपत्रात लिहिला होता. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून, जनसामान्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शनिवारी धाराशिव शहर काँग्रेसच्या वतीने बिबेक देबरॉय यांच्या प्रतिमेस जोडे मारुन दहन केले. यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. संविधान का अपमान नही सहेगा हिंदूस्थान, संविधान बचाव देश बचाव, संविधान बदलणाऱ्या केंद्र सरकारचा घाट घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, भारतीय राज्यघटनेचा विजय असो, संविधान बदलाची मागणी करणाऱ्या भाजप सरकाराचा धिक्कार असो, भाजप सरकार हाय हाय अशा जोरदार घोषणा देत बिबेक देबरॉय यांच्या प्रतिमेस जोडे मारुन दहन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रशांत पाटील, अग्नीवेश शिंदे, राजाभाऊ शेरखाने, सिध्दार्थ बनसोडे, डाॅ. स्मिता शहापूरकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.