राष्ट्र सेवा दलाच्या श्रमछावणी शिबिरास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:20+5:302021-07-04T04:22:20+5:30
नळदुर्ग : राष्ट्र सेवा दलाच्या वतीने येथील आपलं घर परिसरात ३ व ४ जुलै या दोन दिवसात एक हजार ...

राष्ट्र सेवा दलाच्या श्रमछावणी शिबिरास प्रारंभ
नळदुर्ग : राष्ट्र सेवा दलाच्या वतीने येथील आपलं घर परिसरात ३ व ४ जुलै या दोन दिवसात एक हजार झाडे लावण्यात येत असून, त्या करिता श्रमछावणी शिबिरास शनिवारी प्रारंभ झाला. यापूर्वीही परिसरात दोन हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अश्रुबा कदम व नंदकिशोर कोळगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक पन्नालाल सुराणा, आपलं घर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निर्भय कोरे, पदाधिकारी सरिता उपासे, सुधीर खाडे, निजगुण स्वामी, ॲड. अजय वाघाळे आदी उपस्थित होते. या शिबिरात भोसगा, येणेगूर, भूम येथील राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, तसेच कोल्हापूर, इचलकरंजी, हेरवाड, मिरज येथील सदाभाऊ मगदूम, बाबा नदाफ, लता बंडगर हे सेवादल कार्यकर्त्यांसह सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात पर्यावरण विषयावर चर्चा, गीत मंजुषा आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. ४ जुलै रोजी सायंकाळी या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या वृक्षलागवड छावणीचे संचलन व व्यवस्थापन आपलं घरचे अधीक्षक संदीप चवले, धरित्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता शहा, शिक्षक अनिल धामशेटी व त्यांचे सहकारी करीत आहेत.
030721\img-20210703-wa0040.jpg~030721\1643-img-20210703-wa0045.jpg
जिल्हा माहिती अधिकारी वृक्षारोपण करताना~राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस पार्टी गंगापूर तालूका सचिव पदी रामनाथ वाकळे यांची नियुक्ती