नगर परिषद शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST2021-08-18T04:38:15+5:302021-08-18T04:38:15+5:30
शरद पवार विद्यालय उस्मानाबाद : येथील शरद पवार विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन ...

नगर परिषद शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा
शरद पवार विद्यालय
उस्मानाबाद : येथील शरद पवार विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्याध्यापक सुरेश चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी गुणवंत काळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
श्रीपतराव भोसले हायस्कूल
उस्मानाबाद : येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये प्राचार्य साहेबराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संगीत शिक्षक पाटील व त्यांच्या विद्यार्थी चमूने देशभक्तीपर विविध गीते सादर केली. स्काऊट गाईड व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना दिली. याप्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, प्रशासकीय अधिकारी तथा संस्था सदस्य आदित्य पाटील, उपमुख्याध्यापक सिद्धेश्वर कोळी, उपप्राचार्य संतोष घार्गे, पर्यवेक्षक तसेच सेवानिवृत्त शिक्षक, प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. सी. पाटील यांनी केले तर आभार नन्नवरे यांनी मानले.
सिद्धिविनायक मल्टीस्टेट
उस्मानाबाद : येथील श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयात संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी आणि संचालक सतीश सोमाणी यांच्या उपस्थितीत आणि संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश कोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण व भारत माता प्रतिमापूजन झाले. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार. जाधव, गणेश कामटे,
देवीदास कुलकर्णी, नितीन हुंबे तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.