उपजिल्हा रुग्णालयासाठी शहर काँग्रेसचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST2021-08-25T04:37:42+5:302021-08-25T04:37:42+5:30

सद्यस्थितीत कोरोनासह साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे येथील रुग्णालय सुरू होणे गरजेचे आहे. येथील उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यास ...

City Congress fast for sub-district hospital | उपजिल्हा रुग्णालयासाठी शहर काँग्रेसचे उपोषण

उपजिल्हा रुग्णालयासाठी शहर काँग्रेसचे उपोषण

सद्यस्थितीत कोरोनासह साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे येथील रुग्णालय सुरू होणे गरजेचे आहे. येथील उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यास नळदुर्ग व परिसरातील जवळपास ९१ वाड्या, वस्ती व गावांना फायदा होणार आहे. त्यामुळे हे रुग्णालय तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनीही या आंदोलनास भेट दिली. यावेळी त्यांनीही येत्या महिनाभरात हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्यास आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज काझी, नगरसेवक बसवराज धरणे, शहबाज काझी, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, पांडू पुदाले, माजी नगरसेवक सुधीर हजारे, इमाम शेख, मंदार पुदाले, संदीप गायकवाड, सुधीर पुराणिक, फारुक कुरेशी, समीर सुरवसे, शेख शरिफ, कल्पना गायकवाड, निर्मला काळे, सुनीता सावंत, मीरा जगताप, अनिता रणे, कोंडाबाई गायकवाड, कांताबाई जगताप, सुभद्रा मुळे, माजी नगराध्यक्षा झिमाबाई राठोड, सुकमार किल्लेदार, शिवाजी गायकवाड, स्वप्नील डुकरे, रामकृष्ण लांमजणे, शिलरत्न कांबळे, सचिन बेडगे, सतीश पुदाले, अझर जहागिरदार आदी सहभागी झाले होते.

Web Title: City Congress fast for sub-district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.