पाेलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह राेखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:42+5:302021-07-19T04:21:42+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील उपळा (मा.) येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह हाेत असल्याची माहिती पाेलिसांना मिळताच, पथकासह ते विवाहस्थळी दाखल ...

Child marriage was stopped due to the vigilance of the Paelis | पाेलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह राेखला

पाेलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह राेखला

उस्मानाबाद : तालुक्यातील उपळा (मा.) येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह हाेत असल्याची माहिती पाेलिसांना मिळताच, पथकासह ते विवाहस्थळी दाखल झाले. त्यांनी खात्री केली असता, मुलीचे वय १८पेक्षा कमी असल्याचे समाेर आले. यानंतर, पाेलिसांनी वधु-वर पक्षाच्या लाेकांचे प्रबाेधन केले, तसेच १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह केला जाईल, असे बंदपत्रही त्यांच्याकडून घेण्यात आले.

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या उपळा (मा.) गावात अल्पवयीन मुलीचा विवाह हाेत असल्याची माहिती पाेनि दत्तात्रय सुरवसे यांना मिळाली. त्यांनी लागलीच पाेउपनि. हिना शेख, पाेहेकाॅ. प्रकाश खंदारे, पाेना राजू माचेवाड, पाेकाॅ. प्रताप खाेसे, जयश्री चव्हाण यांच्या पथक उपळा येथे रवाना केले. हे पथक विवाहस्थळी पाेहाेचल्यानंतर वधू व वराच्या वयाची खात्री केली. त्यावर वधू मुलीचे वय १८ पेक्षा कमी असल्याचे समाेर आले. यानंतर, पथकाने वधु-वर पक्षासाेबतच उपस्थितांचे समुपदेशन केले. कायद्याचीही त्यांना माहिती देण्यात आली, तसेच १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मुलीचा विवाह केला जाईल, असे लेखी स्वरूपात बंदपत्र त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले. यानंतर, पथक तेथून परतले. पाेलिसांच्या सतर्कतेमुळे हाेऊ घातलेला बालविवाह टळला.

Web Title: Child marriage was stopped due to the vigilance of the Paelis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.