जिल्ह्यात ५२ केंद्र, सातशेवर गर्भवती महिलांना दिली काेराेना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:24+5:302021-07-18T04:23:24+5:30

उस्मानाबाद : गर्भवती महिलांनी लस घ्यावी, असे शासनाचे निर्देश आहेत. परंतु, आजही अनेक महिलांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे हे लसीकरण ...

Carnea vaccine was given to over 700 pregnant women in 52 centers in the district | जिल्ह्यात ५२ केंद्र, सातशेवर गर्भवती महिलांना दिली काेराेना लस

जिल्ह्यात ५२ केंद्र, सातशेवर गर्भवती महिलांना दिली काेराेना लस

उस्मानाबाद : गर्भवती महिलांनी लस घ्यावी, असे शासनाचे निर्देश आहेत. परंतु, आजही अनेक महिलांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे हे लसीकरण अपेक्षित गती घेताना दिसत नाही. जिल्ह्यात एकाच दिवशी म्हणजेच ९ जुलैला सुमारे ५२ सेंटरवर हे लसीकरण ठेवले हाेते. त्यानुसार सुमारे ७०० महिलांनी काेराेनाची लस घेतली. काेराेनाचा संसर्क काहीअंशी कमी झाला असला तरी धाेका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे काेराेना लसीकरणावर भर दिला आहे. दरम्यान, गर्भवतींनीही लस घ्यावी, असे शासनाने सांगिल्यानंतर जिल्हा परिषद आराेग्य विभागाकडून तयारी करण्यात आली. जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला गर्भवती महिलांसाठी विविध लसीकरणे ठेवली जातात. त्यामुळे केंद्रांवर फारशी गर्दी नसते. ही बाब लक्षात घेऊन याच दिवशी जिल्ह्यातील सुमारे ५२ सेंटरवर ९ जुलै राेजी लसीकरण ठेवले हाेते. त्यानुसार सुमारे ७०० महिलांनी काेराेना लसीचा डाेस घेतला. हे प्रमाण वाढविण्यासाठी आता महिन्यातून दाेन दिवस गर्भवती महिलांसाठी लसीकरण कॅॅम्प ठेवण्याचा विचार आराेग्य विभागात सुरू आहे.

चाैकट...

दाेन जिवांची भीती...

शासनाकडून लस घेण्याबाबत कळविले आहे. आशा सेविकांकडूनही लसीकरणाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. परंतु, मनातील भीती जायला तयार नाही. आमच्या डाॅक्टरांशी चर्चा केल्यानंतर लस घेणार आहे.

- एक गर्भवती स्त्री.

आमच्या गावात एकही काेराेना रुग्ण नाही. मात्र, आजूबाजूच्या गावांत रुग्ण आहेत. हा धाेका ओळखूनच गावातीलच केंद्रावर जाऊन काेराेनाची लस घेतली. लस घेतल्यापासून ते आजतागायत मला कसलाच त्रास झाला नाही.

- एक गर्भवती स्त्री.

न घाबरता लस घ्यावी...

जिल्ह्यात आजही काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. संसर्ग काहीअंशी कमी झाला असला तरी धाेका अद्याप टळलेला नाही. हीच बाब लक्षात घेऊन शासनाने गर्भवतींनीही लस घ्यावी, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी न घाबरता लस घ्यावी.

-डाॅ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आराेग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

दृष्टिक्षेपात...

एकूण लसीकरण केंद्र

५२

काेराेना लस घेतली

७००

आता महिन्यातील दाेन दिवस...

काेराेना लसीकरणाच्या अनुषंगाने काही गर्भवती महिलांत संभ्रम आहे. परंतु, आराेग्य यंत्रणेकडून जनजागृती करण्यात येत आहे. एवढेच नाही तर आशाही घरी जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून देत आहेत. या सर्व प्रयत्नांतून गर्भवती महिला लसीकरणासाठी केंद्रात येऊ लागल्या आहेत. हे प्रमाण आणखी वाढविण्याचा आराेग्य विभागाचा प्रयत्न आहे. ९ जुलैला जिल्ह्यातील ५२ सेंटरवर लसीकरणाची साेय केली हाेती. एकाच दिवसात सुमारे ७०० गर्भवतींनी लस टाेचून घेतली. जिल्ह्यातील गराेदर मातांची संख्या विचारात घेता, हे लसीकरण एका महिन्यात दाेन वेळा ठेवण्याच्या अनुषंगाने आराेग्य विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Carnea vaccine was given to over 700 pregnant women in 52 centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.