शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; आमदार ज्ञानराज चौगुलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 18:14 IST

धाराशिव जिल्ह्यातील उग्र आंदोलनानंतर संचार बंदी करण्यात आली आहे. 

- बालाजी बिराजदारलोहारा (धाराशिव ): मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घ्यावे , अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंगळवारी पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, उग्र आंदोलनानंतर धाराशिव जिल्ह्यात सध्या संचार बंदी लागू करण्यात आली आहे. 

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत.आज उपोषणाचा ७ वा दिवस असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. दरम्यान, त्यांच्या समर्थनार्थ आंदोलक आक्रमक झाली आहेत. तसेच अनेक आमदार, खासदार यांनी राजीनामे दिली असून अनेकांनी राजीनाम्याची तयारी केली आहे. मात्र, जरांगे यांनी आमदार, खासदार यांनी राजीनामा न देता सरकारवर दबाव आणावा असे आवाहन केले आहे.

दरम्यान, उमरगा लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्राद्वारे विशेष अधिवेशन घेणेची मागणी केली आहे. माझ्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा म्हणून मराठा समाजाच्यावतीने प्रत्येक गावागावात आमरण, साखळी उपोषण करण्यात येत आहे. तर समाजसेवक विनायकराव पाटील यांनी ३ नोव्हेंबर रोजी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला आहे. एकूणच समाजबांधवांच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत. त्यामुळे सकल मराठा समाजाला तात्काळ सर्व स्तरावर टिकेल असे आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे,अशी मागणी आ.चौगुले यांनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणOsmanabadउस्मानाबाद