लोहा-यात शौचालय बांधकामाच्या वादातून सख्या भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 15:09 IST2017-12-09T15:07:36+5:302017-12-09T15:09:02+5:30

शौचालय बांधकामावरून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला़ ही घटना तालुक्यातील तावशीगड येथे ७ डिसेंबर रोजी दुपारी घडल्याचे उघडकीस आले.

The brother kills of iron in the iron-related dispute | लोहा-यात शौचालय बांधकामाच्या वादातून सख्या भावाचा खून

लोहा-यात शौचालय बांधकामाच्या वादातून सख्या भावाचा खून

लोहारा (जि. उस्मानाबाद) : शौचालय बांधकामावरून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला़ ही घटना तालुक्यातील तावशीगड येथे ७ डिसेंबर रोजी दुपारी घडली़ या प्रकरणी शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी रात्री लोहारा पोलीस ठाण्यात मयताच्या सख्या भावाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील नंदकिशोर शिवाजी बिराजदार व त्यांचे बंधू शामसुंदर शिवाजी बिराजदार (२८) या दोघांमध्ये ७ डिसेंबर रोजी दुपारी घराच्या पाठीमागील बाजूस शौचालय बांधण्याच्या कारणावरून भांडण झाले़ भांडणादरम्यान नंदकिशोर यांनी ढकलल्याने दगडावर पडलेले शामसुंदर बिराजदार हे गंभीर जखमी झाले होते़ जखमी शामसुंदर बिराजदार यांना सास्तूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी मयत घोषित केले.

 याबाबत प्रारंभी लोहारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ त्यानंतर शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी मयताचे सासरे वसंत कोमटे (रा.सिरसल ता.औसा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयताच्या भाऊ नंदकिशोर शिवाजी बिराजदार यांच्याविरूध्द लोहारा ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोउपनि गंगाधर दराडे हे करीत आहेत़ गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कारवाई करून नंदकिशोर बिराजदार यांना अटक केली़

Web Title: The brother kills of iron in the iron-related dispute