भोसगा शिवारात आढळला महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 19:18 IST2018-09-12T19:18:01+5:302018-09-12T19:18:28+5:30
मुंबई- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालगत एका अनोळखी ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला़

भोसगा शिवारात आढळला महिलेचा मृतदेह
येणेगूर (उस्मानाबाद ) : मुंबई- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालगत एका अनोळखी ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला़ ही घटना आज सकाळी उमरगा तालुक्यातील भोसगा शिवारात समोर आली. या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
उमरगा तालुक्यातील भोसगा शिवारातील राष्ट्रीय महामार्गालगत अंबूबाई कागे यांच्या शेताजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मुरूम पोलिसांना मिळाली होती़ घटनेची माहिती मिळताच सपोनि मुस्तफा शेख, पोउपनि डी़पी़सानप, पोहेकॉ निवृत्ती बोळके, खलील शेख, नितीन गुंडाळे, राजू बारकूल, अवचार, गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेहावर (अंदाजे वय ३५) जखमा दिसून आल्या असून, हा प्रकार खुनाचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे़ अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या़ पार्थिवाची उत्तरीय तपासणी आष्टाकासार प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली़ या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.