तुळजापूर तालुक्यात विहिरीत आढळला वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:15 IST2018-12-27T20:14:57+5:302018-12-27T20:15:16+5:30
शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

तुळजापूर तालुक्यात विहिरीत आढळला वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह
तामलवाडी ( उस्मानाबाद ) : तुळजापूर तालुक्यातील दहिवडी शिवारातील विहिरीत एका ६२ वर्षीय वृध्द शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला़ ही घटना बुधवारी मध्यरात्री समोर आली असून, या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील शेतकरी आण्णासाहेब रंगनाथ गाटे (वय-६२) हे बुधवारी शेतात गेले होते़ गावातीलच विलास गाटे यांच्या विहिरीतील पाण्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास आण्णासाहेब गाटे यांचा मृतदेह आढळून आला़ गाटे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे़ मयत शेतकऱ्याचा मुलगा संतोष गाटे (रा.दहिवडी) यांनी गुरूवारी तामलवाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली़ या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण हे करीत आहेत.