तुळजापुरातील महायज्ञात ८० दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:21+5:302021-07-18T04:23:21+5:30
तुळजापूर : ‘लोकमत वृत्तपत्र समूह’, हॅलो फाऊंडेशन, नगर परिषद व शहरातील विविध सामाजिक संस्था यांच्यावतीने तुळजापूर येथे घेण्यात आलेल्या ...

तुळजापुरातील महायज्ञात ८० दात्यांनी केले रक्तदान
तुळजापूर : ‘लोकमत वृत्तपत्र समूह’, हॅलो फाऊंडेशन, नगर परिषद व शहरातील विविध सामाजिक संस्था यांच्यावतीने तुळजापूर येथे घेण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञात ८० दात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.
शुक्रवारी येथील सराया धर्मशाळेत हा रक्तदान महायज्ञ सोहळा पार पडला. याचे उद्घाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसीलदार सौदागर तांदळे, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंतराव कोंडो, माजी नगरसेवक विनोद गंगणे, तुळजाई सांस्कृतिक मंडळाचे पंडितराव जगदाळे, रोटरीचे अध्यक्ष रामचंद्र गिडे, चंद्रकांत कणे, आनंद कंदले, ॲड. स्वाती नळेगावकर, राजेशसिंह राजेनिंबाळकर, गुलचंद व्यवहारे, सागर कदम, वैभव पाठक, महेंद्र कावरे यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान महायज्ञात एकूण ८० रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.
शिबिरासाठी मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे शिवरत्न आतकरे, जयराम माने, मुख्याध्यापक बाळासाहेब जेठीथोर, सज्जन गायकवाड, सुज्ञानी गिराम, महेंद्र कावरे, वैभव अंधारे, सुशील सोनकांबळे, अभ्यंग गायकवाड, मुजफर शेख, बापू रोचकरी, शालन माने, प्रदीप घोळवे, दतात्रय गवळी, अशोक शेंडगे, राहुल मिटकरी, सदानंद राव यांच्यासह ‘लोकमत’चे प्रतिनिधी काक्रंब्याचे रणजीत मोरे, तुळजापूरचे अजित चंदनशिवे, अणदूर येथील दयानंद काळुंके, तामलवाडी येथील संतोष मगर, तसेच शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, डॉ. हेडगेवार रक्तपेढी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नळदुर्ग प्रतिनिधी प्रा. पांडुरंग पोळे यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र कावरे यांनी केले. आभार तुळजापूर प्रतिनिधी गोविंद खुरूद यांनी मानले.
चौकट...........
विशेष सत्कार
याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे माजी नगरसेवक विनोद गंगणे, कोविड लसीकरणासाठी पुढाकार घेणारे आनंद कंदले व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले ‘तुळजाई’चे पंडित जगदाळे यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
महिलांचाही सहभाग
या शिबिरात प्रा. प्रशांत भागवत यांनी ८०, महेंद्र कावरे यांनी ७३ तर रवी पाटील आरळीकर यांनी ५३ व्या वेळचे रक्तदान केले. रवी पाटील व अथर्व पाटील आरळीकर, प्रकाश पवार व प्रणव पवार या पितापुत्रांनी तर नंदकुमार क्षीरसागर व सविता क्षीरसागर या दांपत्याने देखील सहभाग नोंदविला. महिला बचत गटाच्या मंजुषा कुलकर्णी, हर्षदा पानसे, ॲड. अंजली साबळे या महिलांनीही सहभाग नोंदवून रकतदान केले.
मान्यवरांकडून झाले कौतुक...
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, संपूर्ण राज्यभर ‘लोकमत’ रक्तदानाचा उपक्रम राबवित आहे. यामुळे राज्यात रक्तदानाची लोक चळवळ उभी झाली आहे. ‘लोकमत’ समूहाने राज्यभर जवळपास पन्नास हजार रक्त बॅग रक्त संकलित करून हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्याचे काम केले आहे. शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ब्लड बँक या दोन्ही आरोग्य सेवा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे सांगून जास्तीत जास्त शहरवासीयांनी या रक्तदान महायज्ञात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनीही ‘लोकमत’च्या रक्तदान उपक्रमाचे कौतुक करून कोविडसारख्या संसर्ग साथीत रक्ताचा तुटवडा भासत असून, तो तुटवडा भरून करण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून होईल. यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.