राणे यांच्या अटकेचा भाजपकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST2021-08-26T04:34:22+5:302021-08-26T04:34:22+5:30

उमरगा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करून झालेल्या अटकेच्या कारवाईबद्दल भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध ...

BJP protests Rane's arrest | राणे यांच्या अटकेचा भाजपकडून निषेध

राणे यांच्या अटकेचा भाजपकडून निषेध

उमरगा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करून झालेल्या अटकेच्या कारवाईबद्दल भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला, तसेच याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून महाआघाडी सरकारने राणे यांच्या एका वक्तव्याचा गैरअर्थ घेत त्यांच्यावर सूडबुद्धीने विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले. तसेच त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता मोगलाई पद्धतीने अटक करण्यात आली. राणे केंद्रीय मंत्री असल्याने राज्य सरकारने सर्व नियमांची पायमल्ली करत त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप या निवेदनात करण्यात आला. निवेदन देताना तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, राज्य कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य, तालुका सरचिटणीस अनिल बिराजदार, महिला तालुकाध्यक्ष सुलोचना वेदपाठक, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, श्रीकांत मणियार, जयवंत कुलकर्णी, पंकज मोरे, प्रदीप सांगवे, दिलीप गौतम, गुलाब डोंगरे, धर्मराज जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: BJP protests Rane's arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.