आशा कार्यकर्तींची हितगुज कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST2021-01-22T04:29:55+5:302021-01-22T04:29:55+5:30
अणदूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या आशा व आशा गटप्रवर्तिका यांच्या वतीने ‘आशांशी हितगुज’ कार्यशाळा पार पडली. ...

आशा कार्यकर्तींची हितगुज कार्यशाळा
अणदूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या आशा व आशा गटप्रवर्तिका यांच्या वतीने ‘आशांशी हितगुज’ कार्यशाळा पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तिका महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संघटनेच्या राज्य समन्वयक सुरेखा ठाकूर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, आरोग्य पर्यवेक्षक डी. आर. कदम, एस.पी. सुरवसे, एन.एन. डांगे, वैजयंता बोंगरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत कोरोनाच्या महामारीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशांचा कोरोनायोद्धा म्हणून गौरव करण्यात आला तसेच आशा कार्यकर्ती व गटप्रवर्तिका यांच्या अडचणी, समस्या, शासकीय कार्यप्रणाली या बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रास्ताविक आशा गटप्रवर्तिका राजश्री चव्हाण, सूत्रसंचलन लक्ष्मी वाघमारे यांनी केले. आभार गटप्रवर्तिका अनुराधा पापडे यांनी मानले. यावेळी अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २५ गावांतील पन्नास आशा कार्यकर्ती उपस्थित होत्या.