नंदगावातील आराे प्लांट धूळखात, साडेपाच लाखांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST2021-08-18T04:38:25+5:302021-08-18T04:38:25+5:30

नंदगाव : तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने साडेपाच लाख रुपये खर्च करून दाेन आरओ प्लांट बसविला; परंतु चार ...

Arai plant in Nandgaon in the dust, crushed five and a half lakhs | नंदगावातील आराे प्लांट धूळखात, साडेपाच लाखांचा चुराडा

नंदगावातील आराे प्लांट धूळखात, साडेपाच लाखांचा चुराडा

नंदगाव : तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने साडेपाच लाख रुपये खर्च करून दाेन आरओ प्लांट बसविला; परंतु चार वर्षांच्या काळात ग्रामस्थांना घाेटभरही शुद्ध पाणी मिळाले नाही. त्यामुळे सध्या दाेन्ही प्लांट धूळखात पडून आहेत. या अनुषंगाने आता ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे शासकीय निधीतून ऑगस्ट-सप्टेंबर २०१७ मध्ये प्रत्येकी २ लाख ७५ हजार रुपये याप्रमाणे साडेपाच लाख खर्च करून दाेन आरओ प्लांट उभारले. ग्रामस्थांना शुद्ध पाणी माफक दरात मिळावे, हा यामागचा उद्देश; परंतु दाेन्ही प्लांट मागील चार वर्षांपासून पत्र्याच्या शेडमध्ये धूळखात पडून आहेत. आजवर ग्रामस्थांना घाेटभरही शुद्ध पाणी मिळालेले नाही. हा मुद्दा सरपंच सरस्वती कलशेट्टी यांच्याकडे उपस्थित केला असता, ‘आपण सत्तेत येण्यापूर्वीच ही याेजना राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे याेजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी का पुरविले जात नाही, याचे कारण माझ्याकडे नाही. असे असले तरी काही दिवसांपूर्वीच सदरील याेजना कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने ग्रामसेवकांना सूचना केली हाेती. मात्र, त्यांनी आजवर आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे तूर्तास हा प्लांट बंदच आहे.

दरम्यान, ग्रामसेवक रमेश धड्डे यांच्याकडे विचारणा केली असता, आरओ प्लांट सुरू केल्यानंतर त्याचे वेस्टेज पाणी काेठे साेडायचे, हा प्रश्न आहे आणि आमच्याकडे कर्मचारीही नाहीत. एवढेच नाही तर काेणी चालवायलाही घेत नाहीत,’ असे सांगितले.

चाैकट...

सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून आरओ प्लांट बसविण्यात आला; परंतु सुरू करण्याचे काेणी नाव घेत नाही. सुरूच करायचा नव्हता, तर प्लांट बसविला कशासाठी? ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळत नाही.

-प्रदीप वाघमारे, ग्रामस्थ

नंदगाव

येथे आरओ प्लांट बसविल्यानंतर तो कार्यान्वित करणे गरजेचे आहे; परंतु संबंधित मंडळी काम करून माेकळी झाली. ग्रामस्थांना पाणी मिळाे की न मिळाे, याची त्यांनी काळजी केली नाही. विद्यमान सरपंच, सदस्यांनी तरी याबाबतीत पुढाकार घेणे गरजेचे आहे.

-सुरेश जमादार, ग्रामस्थ, नंदगाव

Web Title: Arai plant in Nandgaon in the dust, crushed five and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.