गुगळगाववाडी शाळेत वृक्षांचा वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST2021-08-23T04:34:10+5:302021-08-23T04:34:10+5:30
येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात खडकाळ जागेवर तीन वर्षांपूर्वी जेसीबीच्या साहाय्याने खड्डे खोदून झाडे लावण्यात आली होती. ...

गुगळगाववाडी शाळेत वृक्षांचा वर्धापन दिन
येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात खडकाळ जागेवर तीन वर्षांपूर्वी जेसीबीच्या साहाय्याने खड्डे खोदून झाडे लावण्यात आली होती. प्लॅस्टिक बाटली, सायकल, बैलगाडी, टँकरच्या साहाय्याने पाणी देऊन दोन वर्षे ही झाडे जगवली. त्यानंतर सर्वच झाडांना ग्रामस्थांच्या मदतीने ठिबक सिंचन केले. याच ४५१ झाडांचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, सरपंच शशिकांत व्हनाळे, सदस्य विशाल स्वामी, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, विस्ताराधिकारी शिवाजी सुरवसे, केंद्रप्रमुख प्रकाश मुळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिरुद्ध बिराजदार, ज्ञानेश्वर तळीखेडे, संभाजी पांचाळ, पप्पू मुळे, संजीव अम्माशेट्टे, बळीराम कदेरे, वनविभागाचे चव्हाण, संजीव जाधव, वग्रसेन कांबळे, दासिमे, जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शरण लिंबाळे यांनी केले, तर आभार चंद्रकांत कांबळे सर यांनी मानले.
210821\5404190-img-20210821-wa0019.jpg
गुगळगाववाडी जिल्हा परिषद शाळेत वृक्षांचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यावेळी सभापती सचिन पाटील,गट शिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार आदी.