ऑनलाइनच्या युगात पाटी-पेन्सिल कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST2021-08-01T04:30:13+5:302021-08-01T04:30:13+5:30

अंकुश अंधारे माणकेश्वर : साधारण दोन दशकापूर्वीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणाचा श्रीगणेशा पाटी-पेन्सिलनेच होत असे. आता तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात ऑनलाइन ...

In the age of online, the pencil is out of date | ऑनलाइनच्या युगात पाटी-पेन्सिल कालबाह्य

ऑनलाइनच्या युगात पाटी-पेन्सिल कालबाह्य

अंकुश अंधारे

माणकेश्वर : साधारण दोन दशकापूर्वीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणाचा श्रीगणेशा पाटी-पेन्सिलनेच होत असे. आता तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात ऑनलाइन शिक्षणाला गती आली असून, यामुळे पाटी-पेन्सिल कालबाह्य झाल्याचे दिसून येते.

शिक्षणात अनेक आमूलाग्र बदल झाले आहेत. आता शिक्षणाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत असून, मागील काही वर्षांपासून तर संगणक, मोबाइल आणि टॅबलेटवरच शिक्षणाचे धडे गिरविले जात आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर इत्यादींचा वापर केला जात आहे. ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांना एकसमान ऑनलाइन शिक्षण मिळत असून, पाटी लेखनाची जागा मोबाइलने घेतली आहे. पहिल्या वर्गामध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याचा श्रीगणेशादेखील मोबाइलवरच होऊ लागला आहे. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणप्रणाली ग्रामीण भागात नेटवर्कचा अडसर ठरत आहे.

कोट....

अभ्यास करण्यासाठी आज नवनवीन साधने उपलब्ध आहेत. टॅॅब, संगणक, प्रोजेक्टर या साधनांचा वापर करून शाळेत शिक्षण दिले जात आहे. नवीन शैक्षणिक पद्धतीमुळे पाटी-पेन्सिल कालबाह्य होत आहे.

- राहुल अंधारे, शिक्षक, माणकेश्वर

पूर्वी विविध पद्धतीच्या पाट्या विक्रीसाठी बाजारात असायच्या; परंतु आता मागणी कमी झाल्यामुळे बहुतांश विक्रेते पाट्या विक्रीसाठी ठेवत नाहीत.

- निजाम चाऊस, शालेय साहित्य विक्रेते, माणकेश्वर

Web Title: In the age of online, the pencil is out of date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.