उस्मानाबाद येथे फरार कैदी दहा वर्षानंतर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 20:59 IST2018-09-17T20:58:25+5:302018-09-17T20:59:03+5:30

कारागृहातून रजेवर आल्यानंतर दहा वर्षे फरार असलेल्या एका कैद्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़

After ten years of absconding prisoner arrested in Osmanabad | उस्मानाबाद येथे फरार कैदी दहा वर्षानंतर जेरबंद

उस्मानाबाद येथे फरार कैदी दहा वर्षानंतर जेरबंद

उस्मानाबाद : कारागृहातून रजेवर आल्यानंतर दहा वर्षे फरार असलेल्या एका कैद्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़ ही कारवाई सोमवारी सकाळी कळंब तालुक्यातील दहिफळ शिवारात करण्यात आली़

कळंब तालुक्यातील दहिफळ येथील तानाजी धर्मराज पाटील हे खून प्रकरणात नाशिक कारागृहात शिक्षा भोगत होते़ सन २००९ मध्ये पॅरेल रेजवर आल्यानंतर तानाजी पाटील फरार झाले़ दहा वर्षापासून फरार असलेला कैदी दहिफळ शिवारात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती़

या माहितीवरून पोलीस अधीक्षक आऱ राजा, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, स्थागुशाचे पोनि डी़एम़शेख यांच्या मार्गदर्शनाखाली किसन जगताप, भागवत झोंबाडे, प्रमोद थोरात, समाधान वाघमारे, लव्हारे-पाटील, सोनवणे, चालक चवरे यांच्या पथकाने सोमवारी सकाळी दहिफळ शिवारात कारवाई करून तानाजी पाटील याला ताब्यात घेतले़ संबंधिताला येरमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, कारागृहात रवानगी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़

Web Title: After ten years of absconding prisoner arrested in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.