शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आदित्य ठाकरे म्हणाले, मक्याचं लोणचं आणलंय, पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 10:42 PM

दुष्काळ पाहणी व शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी उमरगा-लोहारा मतदारसंघात दौरा झाला.

उस्मानाबाद : दुष्काळ पाहणी व शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी उमरगा-लोहारा मतदारसंघात दौरा झाला. या दौ-यात त्यांनी आपण शहरी भागातले असल्याने शेतीतील फारसे कळत नाही, मात्र तुम्हाला होणा-या त्रासाची जाणीव आहे, असे सांगत पशुधनासाठी मक्याचं लोणचं आणल्याचे सांगितले. हा शब्द नव्यानेच ऐकलेल्या शेतक-यांची उत्सुकता ताणली गेली अन् त्यांनी हे लोणचं पाहण्यासाठी एकच गर्दी केली. या लोणच्याला उस्मानाबाद भागात मुरघास नावाने ओळखतात.आदित्य ठाकरे यांनी सेनेच्या पदाधिका-यांसह उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, समुद्राळ तर लोहारा तालुक्यातील जेवळी गावांना भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. दुपारी तीनच्या सुमारास नारंगवाडी येथे आगमन झाल्यानंतर शिवसेनेच्या तवीने गावात बसविलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण त्यांनी केले. यावेळी नागरिकांनी त्यांच्या कानावर पाणीटंचाईची दाहकता टाकली. हा प्रश्न शिवसेना सोडवेल असे आश्वासन त्यांनी दिले. समुद्राळ येथील दुष्काळी दाहकता त्यांनी शेतक-यांकडून जाणून घेतली. यावेळी त्यांनी आता निवडणुका तोंडावर आल्या म्हणून आलो नसल्याचे सांगत निवडणुकीत येऊ व निवडणुकीनंतरही, असे म्हणाले. संकटसमयी सेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली. जेवळी येथे नागरिकांशी संवाद साधून संकटसमयी बरे वाईट विचार येतात, तेव्हा आत्महत्येसारखे पाऊल उचलू नका, शिवसेना मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. संवाद साधल्यानंतर पशुधनासाठी आणलेले पशुखाद्य वितरीत करण्यात आले.महिलांनी सांगितली दाहकतानागरिकांशाी संवाद साधताना महिला तळमळीने दाहकता मांडत होत्या. रोजगार बुडवून पाण्यासाठी थांबावे लागत आहे. हे आम्हाला परवडणारे नाही. आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा, पशुधनासाठी खाद्य द्या, अशी विनवणी करण्यात महिला आघाडीवर दिसल्या.असे बनते मक्याचे लोणचेआदित्य यांनी आणलेल्या मक्याच्या लोणच्याला आपल्याकडे मुरघास संबोधले जाते. मका फुलो-यात असताना तोडून त्याचे एक इंचाचे तुकडे केले जातात. एक दिवस वाळवून ते मोठ्या हौदात किंवा प्लास्टिक बॅगमध्ये दबई करीत त्यातील हवा काढली जाते. आर्द्रता संपविली जाते. यानंतर त्यामध्ये मिनरल, क्षार व काही कल्चर मिसळून या मिक्स्चरमध्ये हवा जाणार नाही, अशा पद्धतीने ठेवले जाते. २१ किंवा ४२ दिवस हे मिक्स्चर तसेच ठेवून नंतर त्याचा वापर पशुखाद्य म्हणून केला जातो. या प्रक्रियेला आंबवणे असेही म्हटले जाते. या मुरघासाची चव चांगली होऊन पशुधनास आवश्यक असणारे घटक उन्हाळ्यातही मिळतात. त्यामुळे दुग्धक्षमताही वाढते.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे