कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगदेखील वाढले असून, परिणामी प्रयोगशाळेत स्वॅबचे अहवाल प्रलंबित राहत आहेत. आजही १६ मार्चपासूनचे १७१ अहवाल येणे बाकी आहेत. दरम्यान, शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या ४९ रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ११ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यात रुद्रवाडी, सास्तूर, त्रिकोळी, नाईचाकूर, तुगाव, न्यू बालाजीनगर, पोलीस स्टेशन, काळामठ, माउली हॉस्पिटल, बसवेश्वर शाळा, एसटी कॉलनी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. याशिवाय येणेगूर येथे घेण्यात आलेल्या ६ रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
तालुक्यात आतापर्यंत ९ हजार १५८ आरटीपीसीआर स्वॅब घेण्यात आले असून, त्यामध्ये १ हजार ४६६ कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच ५ हजार ४५९ रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या असून, त्यामध्ये ५६० कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार २६ झाली आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालयात ३० तर ईदगाह कोविड केअर सेंटरमध्ये १८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३२ कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. शुक्रवारी ७ स्वॅब घेण्यात आले.