माय-लेक हाकणार आडसूळवाडीचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:35 IST2021-02-09T04:35:58+5:302021-02-09T04:35:58+5:30
तालुक्यातील आडसूळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी निवडणूक लागली होती. यात गावातील नागरिकांनी एकीचे बळ दाखवत सदस्यांची निवड बिनविरोध केली. ...

माय-लेक हाकणार आडसूळवाडीचा कारभार
तालुक्यातील आडसूळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी निवडणूक लागली होती. यात गावातील नागरिकांनी एकीचे बळ दाखवत सदस्यांची निवड बिनविरोध केली. याशिवाय सदर ‘बॉडी’ कोणत्याही पक्षाची नसेल तर सर्वपक्षियांनी काढलेल्या बिनविरोध सदस्यांची असेल असे जाहीर केले होते.
यात गावातील ३२ वर्षीय दिव्यांग तरुण चंद्रसेन सर्जेराव आडसूळ यांनी पुढाकार घेत गावाला विकासाचा शब्द दिला होता. यानुसार एका पायाने पूर्णत: दिव्यांग असलेल्या चंद्रसेन यांच्यासह त्यांच्या आई लंकाबाई सर्जेराव आडसूळ, पवन रावसाहेब चौधरी, श्रीराम डिगे, स्वाती संजीवन काकडे, सुवर्णा श्रीकांत शिंदे, सुशीला कोळी यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली होती.
यानंतर आरक्षण सोडतीमध्ये सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण पडले. त्यानुसार सोमवारी अध्यासी अधिकारी मंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच, उपसरपंच निवडीसाठी सदस्यांची बैठक संपन्न झाली.
यात सरपंचपदी लंकाबाई सर्जेराव आडसूळ यांची तर उपसरपंचपदासाठी त्यांचे सुपुत्र चंद्रसेन सर्जेराव आडसूळ यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी ग्रामसेवक चौभारकर यांची उपस्थिती होती.
चौकट...
वयाच्या साठी पार केलेल्या लंकाबाई यांना आपल्या एका पायाने धड चालता येत नसलेल्या सुपुत्राने सरपंचपदी बसवले आहे. याशिवाय हा धडपड्या युवक स्वतः उपसरपंचपदी विराजमान झाला आहे. यामुळे आता या गावचा कारभार मायलेक हाकणार आहेत, हे विशेष.