कार्यकर्त्यांनी पालिका निवडणूक कामाला लागावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST2021-08-18T04:38:59+5:302021-08-18T04:38:59+5:30

कळंब : समाजातील शेवटच्या घटकातील नागरिकांना सोबत घेऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे समाजातील ...

Activists should start municipal elections | कार्यकर्त्यांनी पालिका निवडणूक कामाला लागावे

कार्यकर्त्यांनी पालिका निवडणूक कामाला लागावे

कळंब : समाजातील शेवटच्या घटकातील नागरिकांना सोबत घेऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक माणूस काँग्रेसबरोबर जोडला गेला आहे. त्यामुळे पक्षाचा जनाधार कायम असून, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषद निवडणुकीच्या कामाला लागावे, पक्ष सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरण पाटील यांनी केले.

कळंब येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानानिमित्त पक्षाच्या संपर्क कार्यालयात तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. तत्पूर्वी शहरातील गांधीनगर, पुनर्वसन सावरगाव, बाबानगर, कल्पनानगर येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. पक्षाच्या कळंब येथील संपर्क कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले. या वेळी किसान काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी विलास करंजकर, कळंब शहराध्यक्ष शिलानंद शिनगारे, शहर कोषाध्यक्षपदी चंदन विनायकराव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस विधि व न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी नितीन अंगरके, भटक्या विमुक्त जाती-जमाती शहराध्यक्षपदी राजेश पुरी यांची नियुक्ती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील व युवक जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, उपाध्यक्ष भागवत धस यांचेही मार्गदर्शन झाले. प्रास्ताविक शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केले. जिल्हा उपाध्यक्ष दौलतराव माने यांनी ‘व्यर्थ न हो बलिदान’ या विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग कुंभार, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, विधी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत शिंदे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष गौरीशंकर मुळे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू, जिल्हा उपाध्यक्ष शंकर करंजकर, माजी तालुकाध्यक्ष दिलीपसिंह देशमुख, जि.प. सदस्य तांबोळी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, यंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रणित डिकले, उस्मानाबाद शहरध्यक्ष अग्निवेश शिंदे, युवक जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष भूषण देशमुख, विधानसभा अध्यक्ष शशिकांत निरफळ यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन अशोक भातलवंडे व ॲड. भारत लोमटे यांनी केले. तर आभार जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब शेळके यांनी मानले.

160821\28441747-img-20210816-wa0028.jpg

कळंब येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलताना यु काँ चे जिल्हाध्यक्ष शरण पाटील

Web Title: Activists should start municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.