भरधाव कारने दुचाकीला उडवले; धाराशिव जिल्ह्यातील दोन युवा नेत्यांचा मृत्यू
By बाबुराव चव्हाण | Updated: May 24, 2023 09:34 IST2023-05-24T09:33:51+5:302023-05-24T09:34:51+5:30
धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर अपघात

भरधाव कारने दुचाकीला उडवले; धाराशिव जिल्ह्यातील दोन युवा नेत्यांचा मृत्यू
पारगाव (जि. धाराशिव) : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री चारचाकी वाहनाने ( क्र. एमएच.२५-ए.डब्लु. ८१०४) मोटारसायकलला (क्र. एमएच.२५- एवाय. ८५२४) पाठीमागून धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील काँग्रेस ओ.बी.सी. सेलचे तालुका अध्यक्ष अमोल बाबुराव बोडके ( ३०, रा. बनगरवाडी ता. वाशी) व राष्ट्रवादीचे नेते ऍड.अजित भैरट (४२, रा. विजोरा, ता. वाशी) हे दोनजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने बीड येथे नेण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, चारचाकी वाहनातील जखमी व्यक्तींची नावे समजू शकली नाहीत.