शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 22:47 IST

तुळजापुरातील तुळजा भवानी मंदिरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड समर्थक आणि मंदिरातील सुरक्षा रक्षाकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे समोर आले.

तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये आणि मंदिरातील सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची बातमी समोर आली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोदरातील मंदिराचे शिखर उतरण्याला जितेंद्र आव्हाड यांचा विरोध आहे, त्याच अनुषंगाने आव्हाड यांनी मंदिराला भेट देत पाहणी करुन, देवीचे दर्शन घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी ही धक्काबुक्की झाली.

जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेनंतर भाजपकडूनही त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, आव्हाड यांना पुढे न जाऊ देण्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांना दिला. त्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला होता.

नेमकं प्रकरण काय?

तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोदरातील मंदिराचे शिखर उतरण्यात येणार आहे. याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे.त्याच अनुषंगाने आव्हाड यांनी मंदिराला भेट देत पाहणी करुन, देवीचे दर्शन घेऊन आपली भूमिका मांडली.जितेंद्र आव्हाड मंदिरात दाखल झाल्यानंतर राजे शहाजी महाद्वारातून त्यांनी पाहणी केली.

त्यानंतर, मदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षक यांच्यात गोंधळ उडाला.आव्हाड यांना मंदीरात सोडलेल्या ठिकाणाहूनच आम्हालाही आत सोडण्यात यावे, असे म्हणत मंदिरात जाण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी यांची गर्दी झाली होती. यावेळी मंदिरातील सुरक्षारक्षक व आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची देखील झाली होती, विशेष म्हणजे आ. आव्हाड मंदीरात पाहणी करत असल्याने भाविकांची दर्शन लाईन थांबवली, त्यामुळे मोठी गर्दी झाली होती.दुसरीकडे भाजप कार्यकर्ते आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्येही धक्काबुकी झाल्याने तुळजाभवानी मंदिरासमोर प्रचंड गोंधळ उडाला होता, काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

टॅग्स :tuljapur-acतुळजापूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस