धाराशिमध्ये शेतकरी दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By बाबुराव चव्हाण | Updated: August 17, 2023 15:47 IST2023-08-17T15:46:43+5:302023-08-17T15:47:09+5:30

पाेलिसांनी लागलीच ताब्यात घेल्याने अनर्थ टळला 

A farmer couple attempted self-immolation in Dharashiv | धाराशिमध्ये शेतकरी दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

धाराशिमध्ये शेतकरी दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

धाराशिव :तालुक्यातील शेकापूर येथील शेतकरी दाम्पत्याने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहनाच्या प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्याला पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे अनर्थ टळला. शेतातील झाडे ताेडल्या प्रकरणी दिलेल्या तक्रारी अर्जाची चाैकशी हाेत नसल्याचा त्यांचा आराेप आहे.

शेकापूर येथील शेतकरी राजाभाऊ रामभाऊ लगदिवे यांनी ग्रामीण पाेलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला हाेता. शेकापूर शिवारातील गट नं.११ मध्ये असलेल्या शेतातील बाभळीची झाडे ताेडली आहेत. प्रकरणाची चाैकशी हाेवून झाडे ताेडणारांविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी हाेती. परंतु, कारवाई हाेत नसल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला हाेता. मात्र, यानंतरही न्याय मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी दाम्पत्याने गुरूवारी सकाळी जिल्हा कचेरी परिसरात दाखल हाेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी वेळीच दाखल हाेत त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Web Title: A farmer couple attempted self-immolation in Dharashiv