काेराेनाने पालकाचे छत्र हिरावलेल्या १० मुलांना प्रत्येकी ५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:38 IST2021-08-25T04:38:04+5:302021-08-25T04:38:04+5:30

उस्मानाबाद -काेराेनामुळे माता व पिता अशा दाेघांचेही छत्र हरवलेल्या दहापैकी पाच मुलांसाठी यापूर्वीच प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर करण्यात ...

5 lakh each to 10 children deprived of parental umbrella by Kareena | काेराेनाने पालकाचे छत्र हिरावलेल्या १० मुलांना प्रत्येकी ५ लाख

काेराेनाने पालकाचे छत्र हिरावलेल्या १० मुलांना प्रत्येकी ५ लाख

उस्मानाबाद -काेराेनामुळे माता व पिता अशा दाेघांचेही छत्र हरवलेल्या दहापैकी पाच मुलांसाठी यापूर्वीच प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले हाेते. मंगळवारी झालेल्या बैठकीत उर्वरित पाच मुलांकरिता प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम मुलांच्या नावे ‘एफडी’ केली जाणार आहे.

काेराेनाचा संसर्ग हाेऊन ज्या मुला-मुलींच्या डाेक्यावरील पालकांचे छत्र हरवले आहे, त्यांचा शाेध घेण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले हाेते. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाकडून गावा-गावात सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्याप्रमाणे माता व पिता अशा दाेघांचेही छत्र हरवलेली दहा मुले असल्याचे समाेर आले हाेते. २२१ मुले-मुली असे आहेत, ज्यांचे माता अथवा पिता दगावले आहेत. या सर्व मुलांची नाेंदणी राष्ट्रीय बालहक्क आयाेगाच्या पाेर्टलवर करण्यात आली आहे. दरम्यान, ज्या मुलांचे माता व पिताही दगावले आहेत, अशा मुला-मुलींसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला हाेता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पाचजणांना प्रत्येकी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले हाेते. तर मंगळवारी झालेल्या बैठकीत उर्वरित पाच जणांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही रक्कम संबंधित मुलांच्या खात्यावर ‘एफडी’ म्हणून ठेवली जाणार आहे, असे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बळीराम निपाणीकर यांनी सांगितले.

चाैकट...

पाेर्टलवर नाेंदणी...

काेराेनामुळे पालकांचे छत्र हरवलेल्या मुलांची राष्ट्रीय बालहक्क आयाेगाच्या पाेर्टलवर नाेंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले हाेते. त्यानुसार २३१ जणांच्या नाेंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यापैकी १० जणांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत करण्यात आली आहे. उर्वरित मुला-मुलींना शासनाच्या याेजनांचा प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे. त्यानुसार विविध विभागांकडून प्रक्रिया हाती घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: 5 lakh each to 10 children deprived of parental umbrella by Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.